अडीच वर्षांपासून बंद असलेली पुणे-भुसावळ एक्सप्रेस १० जुलैपासून चालू होणार !

‘सोलापूर-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस’ सोलापूर रेल्वे स्थानकावरून सकाळी ६.३० वाजता पुण्याकडे रवाना होते. सकाळी १०.३० वाजता पुण्याला पोचते. त्यानंतर हीच गाडी भुसावळकडे पुणे-भुसावळ एक्सप्रेस म्हणून रवाना होईल.

पंढरपूर-निजामाबाद पॅसेंजरसह २८ रेल्वेगाड्या ८ दिवसांसाठी रहित !

भुसावळ विभागाच्या मनमाड-अंकाई किल्ला रेल्वे स्थानकादरम्यान ‘यार्ड रिमोल्डिंग’ आणि दुहेरीकरण रेल्वे ट्रॅक जोडण्यासाठी ‘नॉन इंटरलॉकिंग’चे काम २३ जून ते ३० जून या कालावधीत होणार आहे. यासाठी ८ दिवसांचा ‘ब्लॉक’ (बंद) घेण्यात आला आहे.

आषाढी वारीनिमित्त सोलापूर रेल्वे विभागाकडून १० दिवसांत १२५ विशेष फेऱ्यांचे नियोजन !

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पुणे-पंढरपूर, कुर्डूवाडी-मिरज, लातूर-मिरज, भुसावळ-पंढरपूर, नागपूर-पंढरपूर, बिदर-पंढरपूर आदी मार्गांवर विशेष रेल्वे धावणार आहेत. या गाड्यांमध्ये सर्वसामान्य (जनरल) तिकिटावर वारकऱ्यांना प्रवास करता येणार आहे.

समस्तीपूर (बिहार) येथे संपर्क क्रांती एक्सप्रेसमध्ये आढळली स्फोटके !

यावरून ‘विद्यार्थ्यांच्या नावाखाली चालू असलेल्या या आंदोलनात आता नक्षलवादी आणि आतंकवादी यांनी शिरकाव केला आहे’, असे कुणाला वाटल्यास चुकीचे काय ?

‘अग्नीपथ’ योजनेच्या विरोधातील हिंसाचारामुळे रेल्वेची ७०० कोटी रुपयांची हानी

केवळ रेल्वे प्रशासनाचीच इतकी हानी झाली असेल, तर अन्य सार्वजनिक संपत्तीची किती हानी झाली असेल, याची कल्पना करता येत नाही. याला उत्तरदायी असणार्‍यांना पकडून त्यांची सर्व संपत्ती जप्त केली पाहिजे !

रहित केलेल्या रेल्वे तिकिटाचे ३५ रुपये मिळवण्यासाठी सुजीत स्वामी यांना ५ वर्षे द्यावा लागला लढा !

निर्णयक्षमतेचा अभाव असलेल्या प्रशासकीय व्यवस्थेचे हे आणखी एक उदाहरण ! कूर्मगतीने प्रशासकीय व्यवहार करणार्‍या संबंधित दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाईच व्हायला हवी ! चिकाटीने लढा देणारे सुजीत स्वामी यांचे अभिनंदन !

ठाणे जिल्ह्यात वाळू माफियांचे ३० ते ५० लाख रुपयांचे साहित्य नष्ट !

मागील काही मासांपासून वाळूमाफियांकडून नदी आणि खाडीतून जाणार्‍या रेल्वे पुलांच्या तळाशी वाळू उपसा चालू असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले होते.

दादर स्थानकातील रेल्वेरुळांवर नियमित फेकल्या जातात प्लास्टिकच्या शेकडो बाटल्या !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम !

पेंटाग्राफमधील ‘स्पार्क’मुळे हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत !

पावसाच्या हलक्या सरींमुळे हार्बर मार्गावर पेंटाग्राफमध्ये ‘स्पार्क’ झाल्याने २४ मे या दिवशी सकाळी लोकल वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

अमरावती येथील एका रेल्वेच्या मार्गाची मालकी अजूनही ब्रिटिशांकडे !

देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाली असतांनाही भारतातील रेल्वे मार्ग ब्रिटिश आस्थापनाच्या कह्यात असणे आजपर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !