‘अग्नीपथ’ योजनेच्या विरोधातील हिंसाचारामुळे रेल्वेची ७०० कोटी रुपयांची हानी

नवी देहली – केंद्र सरकारच्या ‘अग्नीपथ’ योजनेच्या विरोधात गेल्या ५ दिवसांपासून हिंसाचारी आंदोलन केले जात आहे. यामध्ये जाळपोळ आणि तोडफोड करण्यात येत आहे. सार्वजनिक आणि खासगी संपत्तीची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. यात सर्वाधिक हानी रेल्वे प्रशासनाची झाली आहे. सुमारे ७०० कोटी रुपयांची हानी झाल्याचा अंदाज आहे. रेल्वेच्या ६० डब्यांना आणि ११ इंजिनला आग लावण्यात आली. या हिंसाचारामुळे रेल्वेच्या ३५० हून अधिक गाड्या रहित कराव्या लागल्या. रेल्वे स्थानकावर तोडफोड करण्यात आली. विक्रमशिला एक्सप्रेसमध्ये लुटमार करण्यात आली.

संपादकीय भूमिका

केवळ रेल्वे प्रशासनाचीच इतकी हानी झाली असेल, तर अन्य सार्वजनिक संपत्तीची किती हानी झाली असेल, याची कल्पना करता येत नाही. या हानीला उत्तरदायी असणार्‍यांना पकडून त्यांच्याकडून ती वसूल करण्यासाठी त्यांची सर्व संपत्ती जप्त केली पाहिजे, तरच इतरांना याचा वचक बसेल !