अवैधरित्या तिकीट विक्री करणाऱ्या दलालांविरुद्ध मध्य रेल्वेची कारवाई !

रेल्वेच्या तिकिटांची अवैधरित्या विक्री करणाऱ्या दलालांवर मध्य रेल्वेने कारवाई केली आहे. मध्य रेल्वेचे दलालविरोधी पथक आणि आर्.पी.एफ. यांच्या साहाय्याने वाणिज्य शाखेने ही मोहीम राबवली.

ठाणे येथे रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या तरुणाचा रेल्वे पोलिसाने वाचवला जीव !

रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक ३ आणि ४ च्या दरम्यान एक तरुण रेल्वे रूळ ओलांडत असतांना समोरून लोकलगाडी आली. हा थरारक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

पुणे रेल्वे स्थानक आवारातील वस्तू स्फोटके नसून फटाके होते ! – पुणे रेल्वे विभाग

पुणे  रेल्वे स्थानक आवारात १३ मे या दिवशी बाँबसदृश वस्तू आढळल्याची बातमी सर्वत्र पसरली होती. त्याचा खुलासा करत ‘पुणे स्थानक आवारात मिळालेल्या वस्तू स्फोटके नसून फटाके होते’, असे पुणे रेल्वे विभागाचे विभागीय सुरक्षा आयुक्त उदय सिंह पवार यांनी सांगितले.

अकार्यक्षमांना घरचा रस्ता !

सेवेत कामचुकारपणा केल्याचा ठपका ठेवत रेल्वे मंत्रालयाने १९ अधिकाऱ्यांना एकाच वेळी घरचा रस्ता दाखवल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या अधिकाऱ्यांमध्ये सहसचिव स्तरावरील १० अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

परभणी येथे निकृष्ट दर्जाचे बांधलेले उड्डाणपुलाचे खांब पाडले !

निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणाऱ्या कंत्राटदाराला रेल्वे अधिकाऱ्यांचा हिसका !, कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याप्रकरणी त्याचे पैसेही वसूल करून घ्यायला हवेत !

मध्य रेल्वेच्या फलाट तिकीटदरात पाचपट वाढ !

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण आणि पनवेल या महत्त्वाच्या स्थानकांवरील फलाटाचा तिकीटदर १० रुपयांवरून ५० रुपये करण्यात आला आहे. ९ ते २३ मे या कालावधीसाठी तिकिटाचे दर वाढवण्यात आले आहेत.

पुणे ते नाशिक ‘सेमी हायस्पीड’ प्रकल्प अंतिम संमतीकरता केंद्राकडे पाठवला !

या प्रकल्पासाठी मार्गातील १०२ गावांतील १ सहस्र ४७० हेक्टर भूमी लागणार आहे. गावातील भूसंपादन आणि संरेखनासाठी संयुक्त मोजमाप सर्वेक्षण पूर्ण होत असून ५ गावांतील भूसंपादनही झाले असून त्याचा योग्य मोबदलाही भूमीमालकांना दिलेला आहे.

रत्नागिरी रेल्वे स्थानकात ३ दिवस आंबे पडून राहिल्याने हानी

‘रेल्वेमधून हापूसची वाहतूक करावी’, अशी आग्रही भूमिका घेणारे लोकप्रतिनिधी आता गप्प का ?

मुंबईतील वातानुकूलित लोकलच्या तिकिटात ५० टक्के कपात ! – रावसाहेब दानवे

वातानुकूलित लोकलच्या तिकिटाच्या दरात ५० टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. वातानुकूलित रेल्वेच्या तिकिटांच्या दरात किती कपात करावी ? याविषयी जनतेचे मत घेतले होते.

रेल्वेतील कुचकामी सुरक्षाव्यवस्था !

रात्रीच्या वेळी तरुण शस्त्रधारी पोलिसांची नियुक्ती का केली जात नाही ? तरुणांमध्ये असणारे धाडस आणि शारीरिक क्षमता तुलनेने वयस्करांमध्ये अल्प होत जाते, हे वरिष्ठांनी लक्षात घ्यायला हवे. ‘केवळ दाखवण्यासाठी पोलिसांची नियुक्ती केली आहे’, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?