प्राथमिक शाळांमध्ये ‘स्काऊट गाईड’ अनिवार्य करणार ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

व्यक्तीमत्त्व विकास आणि कौशल्य यांवर आधारित प्रशिक्षणासाठी प्राथमिक शाळांमध्ये ‘स्काऊट गाईड’ अनिवार्य करणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

अभाविपच्‍या २० कार्यकर्त्‍यांविरुद्ध गुन्‍हा नोंद !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्‍या आवारातील अवैध ‘रॅपसाँग’ चित्रीकरण, तसेच विविध मागण्‍यांच्‍या संदर्भात अभाविपच्‍या कार्यकर्त्‍यांनी २४ एप्रिल या दिवशी विद्यापिठाच्‍या आवारात घोषणा देऊन आंदोलन केले होते.

अश्‍लील रॅप साँग चित्रीकरणाच्या प्रकरणी पुणे विद्यापिठात अभाविपचे आक्रमक आंदोलन !

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (‘अभाविप’ने) पुणे विद्यापिठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक चालू असतांनाच २४ एप्रिल या दिवशी आक्रमक आंदोलन केले.

पुणे विद्यापिठातील पदवी प्रदान समारंभ बंद होणार ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री

विद्यार्थ्यांना त्यांचे पदवी प्रमाणपत्र ‘डीजी लॉकर’मध्ये (प्रत्यक्ष कागदपत्रांऐवजी ती नागरिकांना डिजिटल स्वरूपात उपलब्ध करण्याची सुविधा) उपलब्ध होणार आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

श्री गणेश अथर्वशीर्ष अभ्यासक्रम स्थगित करण्यासाठी पुणे विद्यापिठातील प्राध्यापकांचे कुलगुरूंना निवेदन !

विज्ञाननिष्ठ समजले जाणारे पाश्‍चात्त्य मन:शांतीसाठी हिंदु संस्कृतीकडे आकर्षित होत आहेत. निवळ हिंदुद्वेषापायी ही प्राध्यापक मंडळी हा अभ्यासक्रम रहित करण्याचा प्रयत्न करत आहेत !

श्री गणेश अथर्वशीर्ष अभ्यासक्रमात पालट करण्याची पुणे विद्यापिठाची भूमिका !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील ‘श्री गणेश अथर्वशीर्ष’ अभ्यासक्रमावर टीका झाल्याने अभ्यासक्रमात पालट करण्याची भूमिका विद्यापिठाने घेतली आहे.

भौतिक प्रगतीसह आध्यात्मिक शांततेसाठी अथर्वशीर्ष अभ्यासक्रमाविषयी माघार नाही ! – चंद्रकांत पाटील

एका गल्लीत चार-चार गणपति मंडळे हवीत; मात्र त्यांचा शास्त्रीय अभ्यासक्रम का नको ? अथर्वशीर्ष अभ्यासक्रम हा शास्त्रीय अध्ययनाचा भाग असून केवळ राजकारण म्हणून विरोध नको. भौतिक प्रगतीसह आध्यात्मिक शांतता महत्त्वाची आहे.

पेशवाई पुन्हा यावी !

पुरोगामित्व, सुधारणावाद, निधर्मीवाद ‘हे ‘वाद’ समाजाला समृद्धीकडे नव्हे, तर विनाशाकडे नेणारे आहेत’, हे जनतेने आता जाणले आहे. त्यामुळे प्रा. नरके करत असलेल्या दिशाहीन टीकेला जनता भीक घालणार नाही. भविष्यात जनतेने अशांचा वैचारिक प्रतिवाद करून त्यांना वठणीवर आणल्यास आश्चर्य वाटणार नाही !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात अथर्वशीर्षावर प्रमाणपत्र अभ्यासक्रम !

पुणे विद्यापिठाच्या संस्कृत प्राकृत विभागाने अथर्वशीर्ष प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालू केला असून संपूर्ण अभ्यासक्रम नि:शुल्क आहे. कुणीही त्यात सहभागी होऊ शकतो.

पुणे विद्यापिठाच्या अथर्वशीर्षाविषयी अभ्यासक्रमाला प्रा. हरि नरके यांचा विरोध !

महाराष्ट्रात श्री गणेश अथर्वशीर्षाला विरोध होणे, ही राज्याची नास्तिकतेकडे वाटचाल नाही का ? पाकिस्तानमध्ये कधी कुराण आणि अमेरिकेत बायबल शिकवण्यास विरोध होणार का ?