अश्‍लील रॅप साँग चित्रीकरणाच्या प्रकरणी पुणे विद्यापिठात अभाविपचे आक्रमक आंदोलन !

आंदोलकांची विद्यापिठात तोडफोड

पुणे – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (‘अभाविप’ने) पुणे विद्यापिठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक चालू असतांनाच २४ एप्रिल या दिवशी आक्रमक आंदोलन केले. विद्यापिठात अश्‍लील रॅप साँगचे चित्रीकरण झाले आणि त्यावर कुलगुरूंनी कारवाई केली नाही, असा आरोप अभाविपने केला आहे. (सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे ! – संपादक) आंदोलकांनी विद्यापिठात तोडफोड केल्याचेही समोर आले आहे.

सौजन्य टीव्ही 9 मराठी

अभाविपने म्हटले आहे की, आम्ही तोडफोड केलेली नाही, संवैधानिक मार्गाने आंदोलन केले आहे. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी अश्‍लील रॅप साँगचे चित्रीकरण झाले. आम्हाला लाज वाटते की, एवढे होऊनही कुलगुरु पदावर कार्यरत आहेत. ज्या वेळी कुलगुरूंनी कारवाई करायला हवी होती, तेव्हा त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही.