पारपत्राची मुदत संपल्याने अफगाणी विद्यार्थी चिंतेत

शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या १ सहस्र ४०० अफगाणी विद्यार्थ्यांपैकी १०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या पारपत्राची (‘व्हिसा’) मुदत संपली आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीच्या कालावधीमध्ये वाढ करण्याची, तसेच पारपत्राची मुदत वाढवून देण्याची मागणी अफगाणी विद्यार्थी करीत आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाची २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी शुल्क कपात !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाने २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी शुल्कात कपात केली असून कोरोना संसर्गामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण शुल्क माफ केले आहे. त्यामुळे आर्थिक अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटचे विलिनीकरण अन्यायकारक असल्याचा विद्यार्थी संघटनांचा आरोप !

रानडे इन्स्टिट्यूट येथील अनुदानित अभ्यासक्रम बंद करून विनाअनुदानित विभागात समावेश करणे अन्यायकारक असल्याचे मनविसे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी सांगितले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या पदव्युत्तर पदविकेच्या अभ्यासक्रमातून छत्रपती शिवरायांचे उलगडणार अनेक पैलू !

शिवाजी महाराजांचे आरमार, प्रशासन, फिल्ड व्हिजिट अँड प्रोजेक्ट रिपोर्ट हे विषय अभ्यासक्रमाच्या दुसर्‍या सत्रात शिकवले जातील.

पुणे विद्यापिठाच्या ‘ऑनलाईन’ परीक्षेतील गोंधळ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या वतीने प्रथम सत्राच्या ‘ऑनलाईन’ परीक्षेकरिता ‘लॉग इन’ होत नसल्याच्या अनुमाने ९ सहस्र तक्रारी परिक्षार्थींनी दाखल केल्या आहेत. ‘लॉग इन’ होत नसल्याने पेपर लिहिता येत नाही.

पुण्यातील सर्व महाविद्यालये ११ जानेवारीपासून चालू करण्याचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचा निर्णय

‘प्रॅक्टिकल करण्यात अडचणी असल्याने आता ११ जानेवारीपासून सर्व अभ्यासक्रमांचे वर्ग प्रॅक्टिकलसह चालू होतील’

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ८ सहस्र विद्यार्थ्यांच्या निकालाची पुनर्तपासणी !

निकालामध्ये चुका का राहिल्या आहेत, हे विद्यापिठाने सांगायला हवे. यामध्ये दोषी असणार्‍यांना कठोर शिक्षा व्हायला हवी. काही केले तरी यामुळे विद्यार्थ्यांना झालेल्या मनस्तापाची हानी कधीही भरून निघणार नाही.