रामनाथ (अलिबाग) येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार !

येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची मान्यता मिळाली आहे. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

परप्रांतियांच्या नोंदी ठेवण्यासाठी मनसे २२ सप्टेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांत निवेदन देणार

अशी माहिती मनसेचे राज्य सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

तालिबानचा सर्वोच्च नेता अखुंदजादा आणि उपपंतप्रधान बरादर गायब !

तालिबानचा सर्वोच्च नेता मुल्ला (इस्लामी विद्वान) हैबतुल्लाह अखुंदझादा आणि सध्याच्या सरकारमधील उपपंतप्रधान मुल्ला अब्दुल घनी बरादार हे दोघे मागील काही दिवसांपासून गायब असून सार्वजनिक ठिकाणी त्यांना कुणीही पाहिलेले नाही.

चिपी येथील विमानतळाचे श्रेय घेणार्‍यांनी जिल्ह्यातील दुर्दशा झालेल्या रस्त्यांचेही श्रेय घ्यावे ! – परशुराम उपरकर, राज्य सरचिटणीस, मनसे

वेंगुर्ले तालुक्यातील चिपी येथील विमानतळाचे श्रेय घेण्यात शिवसेना आणि भाजप यांच्यात चढाओढ लागली आहे; मात्र सत्ताधार्‍यांकडे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी निधी नाही. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गासह ग्रामीण भागातील रस्ते खड्डेमय झाले आहेत.

(म्हणे) ‘भारत इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांना त्याच्या देशात प्रशिक्षण देत आहे ! – पाकिस्तानचा बिनबुडाचा आरोप

याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा !

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचे मुख्यमंत्रीपदाचे त्यागपत्र

राज्यातील भाजप सरकारचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचे त्यागपत्र दिले आहे. रूपाणी यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याकडे त्यागपत्र सोपवले. स्वतः विजय रूपाणी यांनी पत्रकार परिषद घेऊन याविषयीची माहिती दिली.

राज्यघटनेत दुरुस्ती करून आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा उठवणे शक्य ! – शरद पवार

नुकत्याच झालेल्या संसदेच्या अधिवेशनात घटनादुरुस्ती करून केंद्रशासनाने आरक्षणाचा अधिकार राज्यशासनाला दिला आहे. हा अधिकार देतांना राज्यघटनेतील आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा मात्र शिथिल करण्यात आलेली नाही.

मनसेचे गजानन काळे यांच्याविरुद्धची छळवणुकीची तक्रार मागे घेण्यासाठी पोलिसांचा दबाव !

गजानन काळे यांच्या विरोधात नेरूळ पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदा आणि कौटुंबिक अत्याचार कायदा या अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे; मात्र तीन दिवस उलटूनही काळे यांच्यावर कारवाई होत नसल्याचे संजीवनी काळे यांनी सांगितले.

अजून किती व्यापार्‍यांची आत्महत्या होण्याची वाट सरकार पाहणार आहे ? – व्यापार्‍यांचा संतप्त सवाल

व्यापारी सर्व नियमांचे पालन करून दुकाने चालू ठेवतात; मात्र तरीही सरकारने संध्याकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने चालू ठेवण्यास अनुमती दिली नाही. याच्या निषेधार्थ पुणे व्यापारी महासंघ ३ ऑगस्ट या दिवशी घंटानाद आंदोलन करणार आहे.

पूरग्रस्त भागात वीजदेयकांची वसुली नको ! – नितीन राऊत, ऊर्जामंत्री

परिस्थिती निवळल्यावर वीजदेयकात कितपत दिलासा देऊ शकतो, याचा विचार केला जाईल, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगली येथील पत्रकार परिषदेत दिली.