पूरग्रस्त भागात वीजदेयकांची वसुली नको ! – नितीन राऊत, ऊर्जामंत्री

ऊर्जामंत्री नितीन राऊत

सांगली, ३० जुलै – पूरग्रस्त भागात वीजदेयकांची वसुली करू नका, असे आदेश देण्यात आले आहेत. परिस्थिती पूर्ववत् होत नाही, तोपर्यंत वीजदेयकही दिले जाणार नाही. लोकांची पुष्कळ हानी झाली आहे. परिस्थिती निवळल्यावर वीजदेयकात कितपत दिलासा देऊ शकतो, याचा विचार केला जाईल, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगली येथील पत्रकार परिषदेत दिली.