रामनाथ (अलिबाग), (जिल्हा रायगड) – येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची मान्यता मिळाली आहे. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
अलिबागच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची मान्यता मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात १०० विद्यार्थ्यांना यात प्रवेश दिला जाणार आहे. या महाविद्यालयासाठी ५०० खाटांचे रुग्णालय असेल.
जागेआभावी हा प्रस्ताव लालफीतीत अडकला होता. आता उसर येथील ५३ एकरचा भूखंड महाविद्यालयाच्या नवीन इमारत बांधकामासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यावर ४०६ कोटी खर्चून नवीन इमारत बांधली जाणार आहे. महाविद्यालयासाठी १ सहस्र ०७२ पदे भरली जाणार आहेत.
महाविद्यालयासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालय पुढील तीन वर्षांसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने संलग्न करण्यात आले आहे.