Pope Francis : (म्हणे) ‘देवावर हसणे, ही निंदा नाही !’ – पोप फ्रान्सिस

कलाकारांसमवेत झालेल्या चर्चेत मांडले मत

पोप फ्रान्सिस

रोम – ख्रिस्त्यांचे सर्वोच्च गुरु पोप फ्रान्सिस यांनी अमेरिका आणि युरोप येथील प्रख्यात १०० कलाकारांशी संवाद साधला. यांमध्ये विनोदी कलाकार, अभिनेते आणि लेखक यांचा समावेश होता. अमेरिकेतील नामवंत कलाकार हूपी गोल्डबर्ग, जिमी फॅलन, कॉनन ओब्रायन, ख्रिस रॉक आणि स्टीफन कोल्बर्ट यांचाही या बैठकीत समावेश होता. या बैठकीत विनोदी कलाकारांनी विचारलेल्या प्रश्‍नांना पोप फ्रान्सिस यांनी उत्तरे दिली. ‘आपण देवावर हसू शकतो का?’, असा प्रश्‍न त्यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, ‘‘अर्थात् आपण हसू शकतो. ही देवाची निंदा होत नाही. जसे आपण आपल्या जवळच्या लोकांवर विनोद करतो, तसेच देवाचेही आहे.’’

पोप फ्रान्सिस पुढे म्हणाले,

१. चांगला विनोद हा लोकांना अपमानित करत नाही किंवा कुणामध्ये न्यूनतेची भावना निर्माण करत नाही. ज्यू धर्माच्या साहित्यात तर चांगल्या विनोदाची अनेक उदाहरणे दिली आहेत.

२. मी आता जे सांगत आहे, ते अर्थातच असत्य नाही. तुम्ही (कलाकार) जेव्हा असंख्य लोकांच्या चेहर्‍यावर हास्य खुलवण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्ही आपोआपच देवालाही हसवता.

संपादकीय भूमिका

पोप यांचे ऐकून ख्रिस्त्यांनी येशू ख्रिस्त किंवा मदर मेरी यांची चेष्टा किंवा त्यांच्यावर विनोद केला, तर तो त्यांचा प्रश्‍न आहे; मात्र पोप यांचे म्हणणे ऐकून जगभरातील कलाकरांनी हिंदूंच्या देवता किंवा संत यांचा अपमान केल्यास हिंदू ते कधीही स्वीकारणार नाहीत, हेही तितकेच खरे !