Pope Francis : मद्य ही ईश्‍वराने दिलेली देणगी ! – पोप फ्रान्सिस

ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी पुन्हा केले मद्याचे समर्थन !

पोप फ्रान्सिस

व्हॅटिकन सिटी – पोप मद्याच्या नशेत बोलत असल्याचा तुम्हाला भास होईल. वाईन, भूमी, कृषी कौशल्य आणि व्यावसायिक कौशल्य या देवाने दिलेल्या देणग्या आहेत. निर्मात्याने ते आम्हाला दिले आहे; कारण आम्ही त्यांना संवेदनशीलतेने आणि प्रामाणिकपणाने आमच्या आनंदाचा खरा स्रोत बनवतो, असे विधान ख्रिस्त्यांचे सर्वोच्च  धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी केले आहे. याद्वारे त्यांनी ‘मद्य ही ईश्‍वराने दिलेली देणगी आहे’, असेच सांगितले आहे. ते वेरोना शहराचे बिशप (वरिष्ठ पाद्री) डोमेनिको पोम्पिली यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

१. पोप फ्रान्सिस यांनी वर्ष २०१६ मध्येही मद्याच्या समर्थनार्थ वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते, ‘एखाद्याच्या लग्नात मद्य नसेल, तर त्यांना लाज वाटते. जणू चहा पिऊन लग्नाचा सोहळा पार पडला.’

२. पोप फ्रान्सिस यांनी आता ज्या कार्यक्रमाच्या वेळी विधान केले, त्या वेळी इटलीतील अनेक वाईन उत्पादक उपस्थित होते. प्रतिवर्षी एप्रिलमध्ये वेेरोना येथील वाईन स्पर्धेपूर्वी व्हॅटिकन सिटी येथे कार्यक्रम आयोजित केला जातो. इटली हा जगातील दुसर्‍या क्रमांकाचा वाईन उत्पादक देश आहे. गेल्या काही वर्षांपासून युरोपातील मद्यांच्या बाटल्यांवर आरोग्याच्या संदर्भात चेतावणी देण्याची मागणी युरोपीय संघाकडून करण्यात येत आहे; मात्र इटलीतील वाईन उत्पादकांनी याला विरोध केला आहे. या वाईन उत्पादकांनी पोप फ्रान्सिस यांच्या या वक्तव्याचे स्वागत केले आहे.

३. पोप फ्रान्सिस यांनी या वेळी वाईन निर्मात्यांना त्याच्याशी संबंधित नैतिक दायित्व पार पाडण्यास आणि मद्यपानाच्या चांगल्या सवयींना प्रोत्साहन देण्यास सांगितले.