मशिदींवरील ध्‍वनीप्रदूषण करणारे भोंगे काढून संबंधितांवर गुन्‍हे नोंद करा !

अनेक वर्षांपासून वेळीअवेळी भल्‍या पहाटे होणार्‍या भोंग्‍यांच्‍या आवाजामुळे परिसरातील लहान मुले, विद्यार्थी, वयस्‍कर, तसेच आजारी आदींना शारीरिक त्रासांसह मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

‘न्यूजक्लिक’ने रचला होता काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश यांना ‘वादग्रस्त भाग’ दाखवण्याचा आंतरराष्ट्रीय कट !  

देशद्रोही कृत्य करणार्‍या या वृत्तसंकेतस्थळावर अद्यापपर्यंत बंदीच घातली जाणे आवश्यक होते !

इस्लामिक स्टेटचे आतंकवादी गोव्यात आल्याचे वृत्त गोवा पोलिसांनी नाकारले !

या ३ आतंकवाद्यांनी गोव्यानजीकच्या कर्नाटक राज्यातील वनक्षेत्रात बाँबस्फोटाची चाचणी केली होती; मात्र या वेळी आतंकवाद्यांनी गोव्यात प्रवेश केला नव्हता. या प्रकरणी देहली पोलिसांकडून आम्हाला अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

शेंद्रे (सातारा) गावच्‍या सीमेतून ४७ लाख रुपयांचा गुटखा शासनाधीन !

गुटखाबंदी असतांना लाखो रुपयांच्‍या गुटख्‍याची अवैध वाहतूक होतेच कशी ? याच्‍या मुळाशी जाणे आवश्‍यक आहे !

पाषाण (पुणे) येथे ७०० किलो भेसळयुक्‍त तुपासह एकास अटक !

अन्‍न पदार्थांमध्‍ये भेसळ करणार्‍यांना कठोर शिक्षा न झाल्‍याचा परिणाम !

वांगी (जिल्‍हा सांगली) येथील निकम कुटुंबियांना ११ ‘के.व्‍ही.’ विद्युत् वाहक तारेचा ‘शॉक’ देऊन ठार मारण्‍याचा प्रयत्न !

कडेगाव तालुक्‍यातील वांगी येथील अशोकराव शंकरराव निकम यांच्‍या घराच्‍या समोर आणि मागील द्वारास विद्युत् वाहक तारेचा उच्‍च दाबाचा ११ ‘के.व्‍ही.’चा ‘शॉक’ देऊन संपूर्ण कुटुंब संपवण्‍याचा प्रयत्न अज्ञातांनी केला.

महिला उपनिरीक्षकासह ९ पोलीस कर्मचार्‍यांचे निलंबन !

ससून रुग्‍णालयाच्‍या परिसरात ‘मॅफेड्रीन’ अमली पदार्थ सापडला. त्‍यानंतर आरोपी ललित पाटील याने रुग्‍णालयातून पलायन केले. या दोन्‍ही प्रकरणांत कर्तव्‍यात हलगर्जीपणा केल्‍याप्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षकासह ९ पोलीस कर्मचार्‍यांना तडकाफडकी निलंबित करण्‍यात आले आहे.

कोल्‍हापुरातील जिल्‍हा क्रीडा अधिकार्‍याला १ लाख १० सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक !

भ्रष्‍टाचारग्रस्‍त भारत ! अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्‍त करून त्‍यांना अद्दल घडेल, अशी शिक्षा दिल्‍याविना लाचखोरीला आळा बसणार नाही !

गोवा : ३ अल्पवयीन मुलांकडे १२ लाख रुपये किमतीचा गांजा सापडला

ही तिन्ही मुले बिहारची आहेत. ही मुले एका पॉलिथीन पिशवीत १२ किलो गांजा घेऊन ग्राहकांच्या शोधात फिरत होती. अल्पवयीन मुलांचा कुणालाही संशय येणार नाही, यासाठी त्यांचा अमली पदार्थ व्यावसायिक वापर करतात.

सिंधुदुर्ग : तुळसुली येथील शैक्षणिक संस्थेत २१ लाख रुपयांचा अपहार केल्याच्या प्रकरणी कनिष्ठ लिपिकावर गुन्हा नोंद !

तुळसुली येथील लिंगेश्वर माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय चालवणार्‍या तुळसुली ऐक्यवर्धक संघ या संस्थेच्या बचत खात्यातील रकमेचा अपहार केल्याच्या प्रकरणी मुकुंद आत्माराम वारंग यांच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.