क्रीडा खात्याकडून शिक्षकाला पोलीस कोठडीत असतांनाच निलंबनाचा आदेश

फातर्पा येथील शाळेतील शारीरिक शिक्षक रमेश गावकर लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी कुंकळ्ळी येथील पोलीस ठाण्याच्या कोठडीत असतांनाच क्रीडा खात्याकडून त्याला १ सप्टेंबर या दिवशी त्याच्या निलंबनाचा आदेश देण्याचा निराळा प्रकार घडला आहे.

अंबरनाथ येथे इमारतीचा सज्जा कोसळून १ महिला ठार, तर १ जण घायाळ

अंबरनाथ पश्चिम भागातील फातिमा शाळेच्या शेजारी असलेल्या अण्णा सोसायटीतील तिसर्‍या मजल्यावरील एका खोलीचा सज्जा २ सप्टेंबरला पहाटे ५ वाजताच्या सुमारास कोसळला.

मुंबईत विदेशी मद्याचा १ कोटी रुपयांचा साठा जप्त !

गोवा राज्यातील मद्य छुप्या मार्गाने महाराष्ट्रात विक्रीसाठी आणलेल्या तिघांच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुन्हा नोंदवला.

जालना येथील मराठा आंदोलकांवरील लाठीमाराचे महाराष्ट्रात हिंसक पडसाद !

दगडफेकीत बरेच पोलीस कर्मचारी घायाळ झाल्यानंतर पोलिसांनी लाठीमार केला. पोलिसांनी जर लाठीमार केला नसता, तर पोलिसांना पुष्कळ वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले असते.

सर्व गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे ! – जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, सातारा

जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. येथील अलंकार सभागृहामध्ये शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

वर्ष १९९३ मधील वीज घोटाळ्याचे अन्वेषण साक्षीदारांच्या अभावी ठप्प होण्याची चिन्हे !

एखाद्या प्रकरणाचे तब्बल २० वर्षे अन्वेषण चालू रहाणे पोलिसांना लज्जास्पदच !

हिंदूंच्या अस्तित्वाचा लढा !

गेल्या मासात नूंह (हरियाणा) येथे धर्मांधांनी हिंदूंच्या ब्रजमंडल जलाभिषेक यात्रेवर मोठ्या प्रमाणात आक्रमण करत हिंसाचार केला. या पार्श्‍वभूमीवर हा लेख देत आहोत.

बुधवार पेठेत (पुणे) ३ मासांपासून अवैध वास्तव्य करणार्‍या १९ बांगलादेशींना अटक !

बांगलादेशी नागरिक ३ मासांपासून अवैध पद्धतीने वास्तव्य करत असतांना पोलिसांना याचा थांगपत्ता कसा लागत नाही ?

नाशिक येथे महिला पोलिसांकडून अवैध मद्याचे ३२ अड्डे उद्ध्वस्त !

नाशिक महिला पोलिसांनी गावागावांतील अवैध मद्याचे ३२ अड्डे उद्ध्वस्त केले आहेत, तर एकूण ३३ आरोपींविरुद्ध मुंबई मद्यबंदी अधिनियमांतर्गत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण ११ लाख ९४ सहस्र १७० रुपयांचे गावठी हातभट्टीचे मद्य, रसायन आणि इतर साहित्य साधने जप्त करण्यात आली आहेत.

पेठ शिवापूर (तालुका पाटण) येथील अनधिकृत मदरशाचे बांधकाम तात्काळ बंद करावे ! – महिंद ग्रामस्थांची मागणी

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला हे दिसत नाही का ? कि प्रशासनाचा याला पाठिंबा आहे, असा अर्थ काढायचा का ?