बंदुकीची गोळी लागून युवकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी चौघांना पोलीस कोठडी
युवराज दीपक वारंग (वय १८ वर्षे) या युवकाचा २६ नोव्हेंबरला छातीत बंदुकीची गोळी (छरा) घुसून मृत्यू झाला होता. या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी ४ संशयितांना अटक केली अन् त्यांच्याकडून २ बंदूका कह्यात घेतल्या.