टोंक (राजस्थान) येथील गावात गोहत्येमुळे तणाव

काँग्रेसचे सरकार म्हणजे पाकिस्तानी राजवट ! राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यापासून तेथे हिंदूंवर सातत्याने विविध आघात होत आहेत. हिंदूंनी संघटित होऊन याचा विरोध करणे आवश्यक !

‘ड्रगमाफिया’ कोण ?

शासनकर्त्यांनी धर्मशिक्षण देण्याचा विचार प्राधान्याने केला पाहिजे. समस्येच्या मुळाशी न जाता उपाययोजना केल्यास गुन्हेगार त्यावरही मार्ग काढतो आणि पुढे समस्या अतिशय गंभीर स्वरूप धारण करते किंवा जटील बनते. शासनकर्ते हे लक्षात घेतील, ही अपेक्षा !

शिर्डी येथून आतंकवाद्याला अटक !

महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथक आणि पंजाब आतंकवादविरोधी पथक यांनी संयुक्त कारवाई करत शिर्डी येथून एका आतंकवाद्याला अटक केली आहे. राजिंदर असे त्याचे नाव असून तो मूळचा पंजाबचा आहे.

सामाजिक माध्यमांना ज्या बातम्या कळतात, त्या पोलिसांना का कळत नाहीत ?

‘१२ ऑगस्ट २०२२ या दिवशी उत्तरप्रदेशच्या कुशीनगर येथे सलमान नावाच्या व्यक्तीने त्याच्या घरावर पाकिस्तानचा ध्वज फडकावल्यावरून पोलिसांनी त्याला अटक केली होती. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यावर पोलिसांनी ही कारवाई केली.’

बांगलादेशात हिंदु मुलीची छेड काढणार्‍या धर्मांधांना विरोध : पीडितेच्या पित्यावरच प्राणघातक आक्रमण

एकीकडे बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना ‘हिंदूंनी स्वतःला अल्पसंख्यांक समजू नये’ असे म्हणतात; मात्र दुसरीकडे त्यांचे मात्र रक्षण करत नाहीत, असे भारताने हसीना यांना खडसवायला हवे !

२६ नोव्हेंबर २००८ प्रमाणे मुंबईत पुन्हा आक्रमण करू !

वारंवार आक्रमणांच्या धमक्या ऐकत रहाण्यापेक्षा पाकिस्तानातील आतंकवादच समूळ नष्ट करायला हवा !

पुणे येथे गणेशोत्सवात ५ दिवस ध्वनीवर्धक वापरण्यास अनुमती !

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनी प्रदूषणासंबंधीच्या नियमांचे पालन करून गणेशोत्सवामध्ये ४ ऐवजी ५ दिवस सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक आणि ध्वनीवर्धक वापरण्यास अनुमती दिली असल्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे.

डोंबिवली येथील अल्पवयीन मुलीला धमकी देणार्‍या धर्मांधाला अटक !

डोंबिवली येथील एका अल्पवयीन मुलीसमवेत इंस्टाग्रामच्या माध्यमातून राजस्थान येथील सोहेल सलामउद्दीन खान (वय १८ वर्षे) याने मैत्री केली आणि तिला विविध प्रकारची आमीषे दाखवली. त्याने तिची अश्लील छायाचित्रे काढून ती सामाजिक माध्यमांतून प्रसारित करण्याची धमकी दिली होती.

ठार मारण्याची धमकी मिळाल्याने समीर वानखेडे यांची तक्रार !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचे मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी ‘ट्विटर’ वरून जीवे मारण्याची धमकी आल्याच्या विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

भीती दाखवून महिला पोलिसाची १० सहस्र रुपयांची फसवणूक !

इतरत्र स्थानांतर करण्याची भीती दाखवून येरवडा कारागृहातील महिला पोलिसाची अज्ञात व्यक्तीने १० सहस्र रुपयांची आर्थिक फसवणूक केली. ही महिला येरवडा कारागृहात शिपाई पदावर कार्यरत आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.