डोंबिवली येथील अल्पवयीन मुलीला धमकी देणार्‍या धर्मांधाला अटक !

२ दिवसांची पोलीस कोठडी

प्रतिकात्मक छायाचित्र

ठाणे – डोंबिवली येथील एका अल्पवयीन मुलीसमवेत इंस्टाग्रामच्या माध्यमातून राजस्थान येथील सोहेल सलामउद्दीन खान (वय १८ वर्षे) याने मैत्री केली आणि तिला विविध प्रकारची आमीषे दाखवली. त्याने तिची अश्लील छायाचित्रे काढून ती सामाजिक माध्यमांतून प्रसारित करण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी त्याला राजस्थान येथून अटक केली आहे.

प्रथम त्या दोघांमध्ये बोलणे होत असे; पण कालांतराने त्यांच्यात वाद होऊ लागल्याने मुलीने त्याच्या समवेत बोलणे बंद केले. त्यामुळे संतप्त धर्मांधाने तिला वरील धमकी दिली. शेवटी तिने याविषयी घरच्यांना सांगून तक्रार प्रविष्ट केली होती. मुलीला त्रास देत असल्याचे धर्मांधाने मान्य केले. न्यायालयाने त्याला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

संपादकीय भूमिका

सामाजिक माध्यमांद्वारे मैत्री करून मुली आणि तरुणी यांना स्वतःच्या जाळ्यात ओढणार्‍या धर्मांधांचे षड्यंत्र वेळीच ओळखा !