ईदच्या दिवशी दुर्गाडी गडावर आरतीसाठी प्रवेश नाकारल्याने हिंदू आणि शिवसेना यांच्याकडून निषेध !

येथे ईदनिमित्त नमाजपठण होत असतांना आरती आणि घंटानाद करण्यासाठी हिंदूंना प्रवेशबंदी केली जाते. याचा निषेध म्हणून वर्ष १९८६ पासून येथे शिवसेनेच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात येते.

येरवडा कारागृहातून रजेवर गेलेला धर्मांध आरोपी पसार !

येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आरोपींना कोरोना महामारीच्या काळात आपत्कालीन अभिवचन रजेवर सोडण्यात आले होते. याचाच लाभ घेत एका गुन्ह्यातील आरोपी महंमद सद्दाम शफीक शेख रजा संपल्यावर पुन्हा कारागृहात शिक्षा भोगण्यासाठी आला नाही.

खारघर येथे गाडीचालकाने वाहतूक पोलिसाला बोनेटवरून फरफटत नेले !

खारघरमध्ये ९ जुलै या दिवशी सकाळी वाहतूक पोलिसाला चारचाकी चालकाने भरपावसात गाडीच्या बोनेटवरून फरफटत नेले. या प्रकरणी चालकाविरुद्ध खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अलीगड (उत्तरप्रदेश) येथे मशिदीजवळून जाणार्‍या हिंदूंच्या वरातीवर मुसलमानांनी फेकली अंडी !  

हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका, वराती मशिदीजवळून गेल्यावर नेहमीच असा विरोध केला जातो. अशा वेळी हिंदूंना नेहमीच सर्वधर्मसमभावाचे, निधर्मीवादाचे डोस पाजणारे राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, पुरो(अधो)गामी अशा वेळी कुठल्या बिळात लपलेलले असतात ?

अयोध्येत मुसलमानाच्या घरातील फटाक्यांच्या साठ्याचा स्फोट : एक जण घायाळ

हैरिंग्टनगंजमध्ये समीउल्लाह याच्या घरात ठेवण्यात आलेल्या फटाक्यांच्या साठ्याचा स्फोट होऊन यात एक तरुण घायाळ झाला. स्फोटामुळे हे घर कोसळले.

कॉ. पानसरे हत्या प्रकरणाचे अन्वेषण आतंकवादविरोधी पथकाकडे वर्ग करण्याची मागणी

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचे ‘एस्.आय.टी.’कडे असलेले अन्वेषण ‘एटीएस्’कडे वर्ग करण्याची मागणी कॉ. पानसरे यांच्या नातेवाइकांनी मुंबई उच्च न्यायालयात केली. यावर न्यायालयाने राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

नूपुर शर्मा यांचा शिरच्छेद करण्याची धमकी देणार्‍या नासीर याला अटक

देशात कायदा असतांना अशा प्रकारची धमकी देणार्‍यांना कठोरातील कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून पुन्हा कुणाला अशी धमकी देण्याचे त्यांचे धाडस होणार नाही !

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या

या घटनेमुळे संपूर्ण जपान हादरले आहे. आबे हे आतापर्यंत सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहिलेले जपानचे पहिले आणि एकमेव पंतप्रधान आहेत. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांनी वर्ष २०२० मध्ये जपानच्या पंतप्रधानपदाचे त्यागपत्र दिले होते. जगभरातील विविध मान्यवरांनी आबे यांना श्रद्धांजली वाहिली.

केरळमध्ये येशू ख्रिस्ताविषयी अपमानास्पद टिप्पणी करणार्‍या मौलवीच्या विरोधात गुन्हा नोंद

साम्यवाद्यांच्या राज्यात ख्रिस्ती किंवा मुसलमान यांच्या धार्मिक भावना दुखावल्यावर तेथील पोलीस तात्काळ त्याची नोंद घेतात; मात्र हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावर वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करतात, हे लक्षात घ्या !

निझामाबाद (तेलंगाणा) येथे जिहादी आतंकवादी संघटना ‘पी.एफ्.आय.’कडून कराटे प्रशिक्षणाच्या नावाखाली मुसलमानांना शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण !

हिंदूंना लक्ष्य करण्याचे प्रशिक्षण !
‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या ३ नेत्यांना अटक