टोंक (राजस्थान) येथील गावात गोहत्येमुळे तणाव

गावातील सर्व पुरुष पसार !

विरोध प्रदर्शन करताना लोक

टोंक (राजस्थान) – येथील ढाणी गावामध्ये गोहत्येवरून तणावाची स्थिती आहे. त्यामुळे गावात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. येथे गोवंशांचे अवशेष आणि काही शस्त्रे सापडली आहेत. यात ३ बंदुका, सुरे आणि अन्य धारदार शस्त्रे यांचा समावेश आहे. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आरोपींच्या अटकेसाठी येथे आंदोलनही केले. रात्रीच्या वेळी येथे गोहत्या झाल्याचा संशय आहे. गावातील सर्व पुरुष पसार झाले असून केवळ महिलाच घरात आहेत.

संपादकीय भूमिका

काँग्रेसचे सरकार म्हणजे पाकिस्तानी राजवट ! राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यापासून तेथे हिंदूंवर सातत्याने विविध आघात होत आहेत. हिंदूंनी संघटित होऊन याचा विरोध करणे आवश्यक !