आरोपींच्या सुटकेच्या गुजरात सरकारच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

गुजरातमधील बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील ११ दोषींची सुटका करण्याच्या गुजरात सरकारच्या निर्णयाला महिला अधिकार कार्यकर्त्यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

भाग्यनगर येथील भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांना अटक

हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍यांवर अशा प्रकारे कधीही तात्काळ कारवाई केली जात नाही, हे लक्षात घ्या !

गायींची अवैध वाहतूक केल्याच्या प्रकरणी एक व्यक्ती दोषी

एकाच वाहनातून ३६ गायींची वाहतूक करून त्यांना घायाळ केल्याच्या घटनेची नोंद घेत मद्रास उच्च न्यायालयाने एका व्यक्तीला प्राण्यांवर क्रूर अत्याचार केल्याच्या प्रकरणी दोषी ठरवले.

अतिरिक्त पोलीस महासंचालक पातळीच्या समकक्ष अधिकार्‍यांकडून विनायक मेटे यांच्या मृत्यूचा अहवाल मागितला जाईल ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

विनायक मेटे यांचा मृत्यू घातपाताने झाला कि अपघातामुळे, याविषयी त्यांचे कुटुंबीय आणि जनता यांच्या मनामध्ये कोणताही संशय राहू नये, यासाठी या घटनेच्या चौकशीचे दायित्व विशेष पोलीस पथकाकडे देण्यात आले आहे.

नागपाडा (भायखळा) येथे गणपतीच्या मूर्तीवर अंडी फेकणार्‍या धर्मांधाला अटक !

पोलीस बंदोबस्त असतांनाही हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमावर आक्रमण करणार्‍या धर्मांधांना कायदा-सुव्यवस्थेचा धाकच उरला नाही, हे स्पष्ट होते. त्यांना कायद्याचा धाक वाटावा, यासाठी हिंदूंनीच आता पोलिसांवर दबाव आणणे आवश्यक !

पाकिस्तानी गुप्तहेराला देहलीत अटक

पाकिस्तान भारताच्या विरोधात कोणकोणत्या क्लुप्त्या लढवत आहे, हेच यातून स्पष्ट होते. अशा पाकला समूळ नष्ट केल्यासच सर्व समस्या सुटू शकतील, हे सरकारने जाणावे !

सातारा येथे जादूटोण्याद्वारे तरुणीवर बलात्कार करणार्‍या मदरसाचालकाला अटक

अशांना शरीयत कायद्यानुसार कमरेएवढ्या खड्ड्यात पुरून त्यांना दगड मारून ठार मारण्याची मागणी कुणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !अशा वेळी अंनिसवाले कुठल्या बिळात जाऊन लपतात ?

‘झोमॅटो’च्या विरोधात तक्रार प्रविष्ट !

झोमॅटोच्या विज्ञापनातून हा अवमान करण्यात आला होता. या विज्ञापनामध्ये अभिनेते हृतिक रोशन यांनी काम केले होते. त्यामुळे हृतिक रोशन, झोमॅटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपिंदर गोयल यांच्या विरोधात ही तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.

मध्यप्रदेशमध्ये टोल देण्यास नकार देत तरुणाची टोल कर्मचारी महिलेस मारहाण

या घटनेचे चित्रण येथील सीसीटीव्हीमध्ये झाले. ते सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून तरुणाचा शोध घेण्यात येत आहे.

ज्ञानवापी खटल्यातील महिला याचिकाकर्त्यांच्या घराची माहिती काढण्याचा प्रयत्न

या प्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी याच खटल्यातील पक्षकार डॉ. सोहनलाल आर्य यांनाही ठार मारण्याची धमकी आलेली आहे.