सातारा येथे जादूटोण्याद्वारे तरुणीवर बलात्कार करणार्‍या मदरसाचालकाला अटक

सातारा – तरुणीवर जादूटोणा करून तिच्यावर बलात्कार करणार्‍या मुक्तार नासीर शेख याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. तो राजसपुरा पेठेत मदरसा चालवतो.

पीडित तरुणीने कौटुंबिक अडचणींच्या निवारणासाठी मुक्तार याच्याशी संपर्क साधला. ओळखीनंतर त्याने तिच्या घरी जाऊन डोक्यावरून लिंबू फिरवले आणि अर्धवट शुद्धीत असलेल्या तरुणीवर बलात्कार केला. याविषयी तक्रार प्रविष्ट केल्यावर पोलिसांनी शेख याच्याविरुद्ध बलात्कार आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.

संपादकीय भूमिका

अशांना शरीयत कायद्यानुसार कमरेएवढ्या खड्ड्यात पुरून त्यांना दगड मारून ठार मारण्याची मागणी कुणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये ! अशा वेळी अंनिसवाले कुठल्या बिळात जाऊन लपतात ?