अ‍ॅलोपॅथी आणि आयुर्वेदीय औषध घेणारे रुग्ण केवळ अ‍ॅलोपॅथी औषध घेणार्‍या रुग्णांच्या तुलनेत लवकर कोरोनामुक्त झाले !

संपूर्ण देशात कोरोना उपचारांमध्ये आयुर्वेदाचा अधिकृतरित्या सहभाग करून घ्यावा, असेच या संशोधनातून जनतेला वाटेल ! केंद्र सरकारने यावर निर्णय घेणे आवश्यक !

प्राथमिक आरोग्यकेंद्रांसाठी आणलेल्या रुग्णवाहिका ५ दिवस जिल्हा मुख्यालयात विनावापर !

शासनाकडून खरेदी केलेल्या रुग्णवाहिका केवळ ‘पासिंग’ केले नाही म्हणून मुख्यालयात शोभेच्या वस्तूसारख्या उभ्या करून ठेवणे योग्य आहे का ?

सावंतवाडीत ५० खाटांचे अद्ययावत रुग्णालय उभारणार ! – अमित सामंत, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रस, सिंधुदुर्ग.

सावंतवाडी येथे म्हाडाच्या अंतर्गत ५० खाटांचे अद्ययावत रुग्णालय उभारण्यात येणार आहे.

गोवा शासनाकडून १८ ते ४४ वयोगटासाठी कोरोना लसीकरण कार्यक्रम घोषित

७ ते १५ जून या कालावधीत खलाशी, टॅक्सीचालक, रिक्शाचालक, पायलट आणि विविध व्याधी असलेले रुग्ण यांचे कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे.

नागपूर येथील मेयो रुग्णालयातील २०० हून अधिक निवासी आधुनिक वैद्य सामूहिक रजेवर !

अत्यवस्थ रुग्णांना आधुनिक वैद्यकीय सेवा देत असल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. ‘मार्ड’च्या नेतृत्वाखाली हे आंदोलन चालू करण्यात आले आहे.

नागपूर येथे ‘म्युकरमायकोसिस’चे १ सहस्र १२२ हून अधिक बाधित आढळले !

जिल्ह्यात ‘म्युकरमायकोसिस’ची रुग्णसंख्या १ सहस्र १२२ हून अधिक झाली आहे. याचसमवेत ‘म्युकरमायकोसिस’मुळे १०० जणांचा मृत्यू झाला आहे.

नागपूर जिल्ह्यातील ५९ गावांमध्ये सवा वर्षापासून एकही कोरोनाबाधित व्यक्ती आढळली नाही !

विषाणूला वेशीवरच रोखणार्‍या या सर्वच गावांतील ग्रामस्थांच्या प्रयत्नांचे कौतुकच करायला हवे !

उपचाराच्या वेळी कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यामुळे धर्मांध नातेवाइकांकडून डॉक्टरला मारहाण !

भाजपच्या राज्यात धर्मांधांचे असे धाडस पुन्हा होऊ नये; म्हणून सरकारने अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !

कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा एक डोस पुरेसा ! – बनारस हिंदु विश्‍वविद्यालयाचे संशोधन

हे संशोधन अमेरिकेतील जर्नल सायन्स इम्यूनोलॉजीमध्ये प्रकाशित करण्यासाठी निवडण्यात आले आहे.

ज्येष्ठ त्यांचे आयुष्य जगले असल्याने त्यांच्याऐवजी तरुणांना लस द्या !  

जर केंद्र सरकारकडे लसच नव्हती, तर त्यांनी लसीकरणाची घोषणा का केली ?