सावंतवाडी – कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी येथे महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास महामंडळाच्या (म्हाडाच्या) अंतर्गत ५० खाटांचे अद्ययावत रुग्णालय उभारण्यात येणार आहे. येथील जिल्हा रुग्णालयाच्या शेजारी उभारण्यात येणार्या या रुग्णालयात अद्ययावत व्हेंटीलेटर, ऑक्सिजन खाटा यांची सोय असणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी सामंत पुढे म्हणाले की, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने हा निर्णय घेण्यात आला आहे. याविषयीचे आदेश जिल्हाधिकार्यांना प्राप्त झाले आहेत. भविष्यात कोरोनाचे रुग्ण वाढल्यास १०० खाटा येथे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.