गोंडा (उत्तरप्रदेश) येथे गॅस सिलिंडरच्या स्फोटात २ घरे उद्ध्वस्त झाल्याने ८ जणांचा मृत्यू

एका घरात जेवण बनवत असतांना गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन झालेल्या अपघातामध्ये २ घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाविषयीच्या घडामोडी

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्व सीमा १५ जूनपर्यंत बंद रहाणार

कोरोनाने मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करणार्‍या ठेकेदाराकडून होणार्‍या लुबाडणुकीची चौकशी करा !

ठेकेदाराने लुबाडलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांनी मनसेचे पदाधिकारी अथवा जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करावी.

संभाजीनगर जिल्ह्यात ‘म्युकरमायकोसिस’ रोगामुळे ५७ जणांचा मृत्यू !

जिल्ह्यात ‘म्युकरमायकोसिस’चे एकूण ६०८ रुग्ण आढळले आहेत. यातील ३४५ रुग्ण उपचार घेत असून २०६ जण बरे होऊन घरी परतले आहेत, तर ५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

गोव्यात चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित आढळण्याचे प्रमाण १ मासात घटून अर्ध्यावर  !

आतापर्यंतच्या एकूण मृत्यूंपैकी ५६ टक्के मृत्यू मे २०२१ मध्ये

बुलढाणा येथे विलगीकरण कक्षाची शाळकरी मुलाकडून स्वच्छता !

कोरोनाच्या आगामी तिसर्‍या लाटेत लहान मुलांना धोका असतांना विलगीकरण कक्षाची मुलांकडून स्वच्छता करवून घेणे, हे प्रशासनाला लज्जास्पद  ! यासाठी अन्य कामगारांची नियुक्ती करून स्वच्छता करवून का घेतली नाही ? उद्या त्या मुलाच्या जीवावर बेतल्यास त्याला उत्तरदायी कोण ?

आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे कोरोनामुळे निधन झाल्यास कुटुंबाला शासनाकडून २ लक्ष रुपयांचे आर्थिक साहाय्य

गोव्याच्या नावापुढील ‘दमण आणि दीव’ हे शब्द वगळण्याचे काम राज्याचा कायदा विभाग करणार आहे.

देहलीत तिसर्‍या लाटेत प्रतिदिन ४५ सहस्र जण बाधित होतील ! – आयआयटी देहली

या काळात शहरातील रुग्णालयांना प्रतिदिन ९४४ मेट्रीक टन ऑक्सिजनची आवश्यकता भासेल, असेही आयआयटी देहलीने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.

गंभीर संसर्ग असणार्‍या कोरोना रुग्णांवर उपचारास नकार दिल्यास कठोर कारवाई ! – जयंत पाटील, पालकमंत्री, सांगली

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या संदर्भात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत त्यांनी ही चेतावणी दिली.

सरकाने कोरोनाने मृत्यू झालेल्यांची माहिती लपवल्याने भाजप ‘कोविड’ मृत्यूचे विशेष ‘ऑडिट’ करणार

लस निर्माण करणार्‍या आस्थापनांचे उत्पादन एका वर्षात १० कोटी होत असल्यास देशातील सर्व लोकांना लस मिळण्यासाठी १२ मास लागणार आहेत. एप्रिल मासामध्ये झालेले मृत्यूकांड आणि कोरोना लस यांचा काय संबंध ?