पणजी – राज्यशासनाने १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी कोरोना लसीकरण कार्यक्रम घोषित केला आहे. ३ ते १० जून या कालावधीत विकलांग, स्तनपान करणारी माता, २ वर्षे किंवा त्याहून अल्प वयाचे मूल असलेले पालक आणि ७ ते १५ जून या कालावधीत खलाशी, टॅक्सीचालक, रिक्शाचालक, पायलट आणि विविध व्याधी असलेले रुग्ण यांचे कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणासाठी केंद्रामध्येच नोंदणी सुविधा उपलब्ध असणार आहे.