चैत्र एकादशीनिमित्त पंढरपूर येथे ५ लाख भाविकांची मांदियाळी !

एकादशीच्या पहाटे श्री विठ्ठलाची नित्यपूजा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर यांनी, तर श्री रुक्मिणीमातेची नित्यपूजा मंदिर समितीच्या सदस्या अधिवक्त्या माधवी निगडे यांनी केली.

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात चैत्र यात्रेच्या काळात नारळाची विक्री करण्यास आणि वाढवण्यास मनाई !

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम !
असे निर्णय अन्य धर्मियांच्या उत्सवांच्या वेळी घेण्याचे धाडस प्रशासन दाखवणार का ?

राज्यातील मंदिरे आणि धार्मिक स्थळे येथे परंपरेनुसार गुढीपाडवा साजरा !

महाराष्ट्रातील विविध प्रसिद्ध मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे येथे तेथील परंपरांनुसार गुढीपाडवा साजरा करण्यात आला.

विठ्ठलाकडे जाण्‍याचा ‘मार्ग’ प्रशस्‍त ! 

मंदिर परिसराच्‍या विकासासमवेत मंदिरांना भक्‍तीरस आणि धर्मशिक्षण यांची केंद्रे बनवा !

पुरातन मंदिरे आणि वास्तू यांना धक्का न लावता पंढरपूर ‘कॉरिडोर’चे काम करू ! – महाराष्ट्र शासन

श्रीक्षेत्र पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या परिसराच्या विकासासाठी करण्यात येणार्‍या ‘कॉरिडोर’च्या कामाविषयी वारकरी, मंदिर समिती, स्थानिक नागरिक, व्यापारी, लोकप्रतिनिधी, दिंडीकरी यांच्या समवेत शासनाची बैठक पार पडली. 

‘पंढरपूर कॉरिडॉर’ : पुरातन वास्तूंचे जतन आणि आत्मोन्नतीचे ठिकाण होणे अपेक्षित !

मंदिर परिसरात आजही सहस्रो भाविकांना अत्यल्प दरात रहाण्याची सोय घरोघरी केली जाते. ही घरे पाडल्यास इतक्या भाविकांची रहाण्याची सोय शासन करू शकणार आहे का ?

मंदिरेही असुरक्षित ?

महान भारतीय संस्‍कृती असलेल्‍या भारतात अशा प्रकारे मंदिरे असुरक्षित असणे चिंताजनक आहे. यासाठी समाजाला आदर्श करण्‍यासाठी छोट्यातल्‍या छोट्या गुन्‍ह्यालाही त्‍वरित कठोर शिक्षा होणे आवश्‍यक आहे.

पंढरपूर मंदिरातील १ टन द्राक्षे गायब झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी !

‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समिती’ची पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी

पंढरपूर येथील नामसंकीर्तन सभागृहास तात्काळ निधी उपलब्ध करून देणार ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

नामसंकीर्तन सभागृहाचे काम निधीअभावी अपूर्ण असून, यास आवश्यक निधीची तात्काळ उपलब्धता करण्यात येईल. येथे येणार्‍या भाविकांना उत्तम सोयी-सुविधा असलेले सभागृह उपलब्ध होईल- सुधीर मुनगंटीवार.

पंढरपूर मंदिरात सजावटीसाठी वापरलेली १ टन द्राक्षे गायब !

मंदिरातील द्राक्षांच्या संदर्भात अशी स्थिती असेल, तर मंदिरात अर्पण स्वरूपात येणारे धन किती सुरक्षित रहात असेल ? असा प्रश्‍न भाविकांना पडल्यास चूक ते काय ? या उदाहरणावरून मंदिरांच्या सरकारीकरणाचे दुष्परिणाम लक्षात येतात.