श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरात दानपेट्यांमध्‍ये खोटे दागिनेही अर्पण !

येथील श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरात असलेल्‍या दानपेट्यांमध्‍ये खोटे दागिने जमा झाले आहेत. भाविकांनी देवाकडे साकडे घातल्‍यानंतर नवस पूर्ण करण्‍यासाठी आर्थिक अडचण असल्‍यास भाविक देवाला खोटे दागिने अर्पण करतात.

पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सरकारी नियंत्रणातून मुक्त करणार ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

हिंदु समाज हा एकसंध राहिला पाहिजे. मंदिराचे सरकारीकरण आणि बळजोरीने होऊ घातलेला ‘कॉरिडॉर’ दोन्ही गोष्टी अन्यायकारक आहेत.

‘पंढरपूर कॉरिडॉर’च्या विरोधात न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांची चेतावणी

वाराणसी येथे कॉरिडॉरमुळे अनेक प्राचीन मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. त्याच पद्धतीने पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर सुंदर दिसावा, यासाठी ‘कॉरिडॉर योजना’ सिद्ध केली जात आहे.

पंढरपूर येथे दर्शनासाठी आलेल्या ३० हून अधिक भाविकांना विषबाधा !

चंद्रभागा नदीकाठी असणार्‍या एका उपाहारगृहामध्ये या भाविकांनी जेवण केले होते. त्यानंतर त्यांना उलट्या आणि जुलाब  होऊ लागल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार चालू करण्यात आले.

पंढरपूर विकास आराखड्याच्या विरोधात वारकरी संप्रदायाची दिंडी !

‘वारकरी संप्रदाय विकासाला कधीही विरोध करणार नाही; मात्र विकास आराखड्यासाठी शासनाने आमच्याशी चर्चा करावी, आम्हाला विश्वासात घ्यावे. शासनाची विकास आराखड्याविषयीची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.

पंढरपूर विकास आराखड्याला विरोध करू नये ! – बंडातात्या कराडकर, ज्येष्ठ कीर्तनकार

ते म्हणाले की, विकास आराखड्यामध्ये बाधित होणारे स्थानिक व्यापारी आणि रहिवासी यांना राज्य सरकारने भरीव आर्थिक साहाय्य देऊन त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करावे; परंतु विकासकामाला व्यापार्‍यांनी विरोध करू नये.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची ‘तीर्थक्षेत्र बचाव समिती’ समवेत बैठक !

‘कॉरिडॉर’ची (विकास आराखड्याची) कार्यवाही करतांना स्थानिक आणि बाधित नागरिक अन् व्यापारी यांना विश्वासात घेतल्याविना काहीही होणार नाही. सर्व नागरिकांच्या सूचनांचा १०० टक्के विचार करूनच पुढील निर्णय घेतले जातील.

पंढरपूर येथे एकादशीनिमित्त सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केला ‘निर्धार फाऊंडेशन’चा सन्मान !

कार्तिकी वारीच्या निमित्ताने निर्धार फाऊंडेशनच्या माध्यमातून ‘सांगलीची स्वच्छतावारी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दारी’ ही विशेष मोहीम राबवण्यात आली होती.

कार्तिकी यात्रेत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला ३ कोटी २० लाख रुपयांचे उत्पन्न !

नुकत्याच झालेल्या कार्तिकी यात्रेच्या कालावधीत येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला एकूण ३ कोटी २० लाख ५९ सहस्र ५४२ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे, अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.

शेतकरी, कष्टकरी वर्गाला सुजलाम् सुफलाम् कर !

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘अनेक आक्रमणे होत असतांनाही वारकर्‍यांनी भागवत धर्माची पताका फडकवत ठेवली. वारीचा हा अभूतपूर्व सोहळा पहाणार्‍याच्या डोळ्यांचे पारणे फिटते.