वारीचे स्‍वरूप बदलले असले, तरी आजही त्‍याचा आत्‍मा कायम आहे ! – डॉ. गो.बं. देगलूरकर

समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणे ही त्‍या काळाची आवश्‍यकता होती. त्‍यामुळे त्‍या वेळच्‍या संतांनी आपापले संप्रदाय बाजूला ठेवून सर्वांचा एकच देव म्‍हणजे विठ्ठल हे तत्त्व मान्‍य केले आणि तेव्‍हापासून वारीला आरंभ झाला असे देगलूरकर यांनी सांगितले.

पंढरीची वारी : महाराष्ट्राचे ऐश्वर्य आणि वडिलोपार्जित वारसा !

पंढरीची नित्‍य वारी, गळ्‍यात तुळशीची माळ, संप्रदायाला प्रमाणभूत असलेल्‍या ग्रंथांचे वाचन, पठण, नामस्‍मरण नामसंकीर्तन, विठ्ठल हेच दैवत, सहिष्‍णुता, सदाचार, शाकाहार, व्‍यसनहीनता ही वारकरी पंथाची काही वैशिष्‍ट्ये सांगता येतील.

आषाढी वारीसाठी प्रस्‍थान सोहळ्‍याची देहू आणि आळंदीतील संस्‍थानकडून जय्‍यत सिद्धता !

आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अवघ्‍या ४ दिवसांवर आहे. जगद़्‍गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा येत्‍या १० जूनला देहूतून पंढरपूरकडे प्रस्‍थान ठेवणार आहे.

पंढरपूर मंदिर आणि अक्कलकोट तीर्थक्षेत्र यांच्या विकास आराखड्याला शासनाकडून मान्यता !

पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पंढरपूर मंदिर विकास आराखड्याचे या वेळी सादरीकरण केले. यामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धन, पायाभूत सुविधा, गर्दी व्यवस्थापन, पर्यटक सुविधा नियोजन करण्यात येणार आहे.

पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकारीपदी राजेंद्र शेळके !

येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकारीपदी उपजिल्हाधिकारी राजेंद्र शेळके यांची ३ वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

मंदिर सरकारीकरण : हिंदूंसाठी एक अभिशाप !

सरकारीकरण झालेल्या महाराष्ट्रातील प्रत्येक मंदिराच्या देवनिधीचा अपवापर होतांना दिसतो. एकदाचे सरकारच्या कह्यात मंदिर आले की, आपल्याला हवा तसा मंदिरांच्या देवनिधीचा वापर करायचा, हे नित्याचे झाले आहे.

सरकारीकरण झालेल्या मंदिरांतील विविध घोटाळे !

देवधनाचा दुरुपयोग करणारे देव आणि धर्म विरोधीच !

इतिहासात प्रथमच संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे त्र्यंबकेश्‍वरहून १ दिवस आधी प्रस्थान होणार !

प्रतिवर्षी चतुर्दशीच्या दिवशी पालखीचे होणारे प्रस्थान यंदा त्रयोदशीला, म्हणजेच २ जूनला होणार ! २८ जून या दिवशी पालखी पंढरपूरला पोचेल. ३ जुलै या दिवशी परतीचा प्रवास चालू होऊन २० जुलै या दिवशी पालखीचे त्र्यंबकेश्‍वर येथे आगमन होईल.

आषाढी एकादशीपासून श्री विठ्ठल मंदिरात भाविकांना करता येणार सेवा !

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची बैठक २० एप्रिल या दिवशी पार पडली . या बैठकीत शेगाव येथील गजानन महाराज संस्थानच्या धर्तीवर श्री विठ्ठल मंदिरात भाविकांना विनामूल्य सेवा करण्याचा लाभ देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे पोलीस करणार पायी गस्त !

भाविकांच्या सुरक्षेसाठी पंढरपूर शहरातून पोलिसांनी पायी गस्त करावी,समाजकंटक, गुंडगिरी करणारे, भुरटे चोर यांच्यावर जरब बसावी, यासाठी पोलीस अधिकार्‍यांना सरदेशपांडे यांनी या सूचना दिल्या आहेत.