सोयीस्कर अभिव्यक्ती स्वातंत्र्य !

कोणते कपडे घालायचे, याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला असते; म्हणून कुणी नग्न फिरायला लागला, तर त्याला निर्लज्जपणा किंवा स्वैराचार म्हणतात. याचे भान लहान मुलालाही असते. संस्कृती, सभ्यता, पावित्र्य या शब्दांपर्यंत जाण्याची कुवत नसल्यामुळे तृप्ती देसाई यांना एवढे कळले, तरी पुरेसे आहे.

आमदारकी रहित होणार ?

खुलेपणाने दुसर्‍या महिलेसमवेतच संबंधांविषयी समर्थन करून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ला मान्यता देणार्‍या अनैतिक धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काढून घेतात का ? याकडेही महाराष्ट्रवासियांचे लक्ष आहे !

कोरोनाचे दूरगामी परिणाम…!

मानसिक स्वास्थ्य कोणत्याही परिस्थितीत टिकवून ठेवण्यासाठी मनोविकारतज्ञ काही सूचना देणे, मार्गदर्शन करणे इत्यादी करू शकतात; मात्र या सर्वांवर एकमेव परिणामकारक उपाय आहे आणि तो म्हणजे जीवनाकडे सकारात्मकतेने पाहून मनोबल उंचावण्यासाठी काळानुसार साधना करून आध्यात्मिक सामर्थ्य वाढवणे.

वाढती लाचखोरी : कठोर उपाययोजना कधी ?

राज्यात विविध न्यायालयांत चालू असलेले लाचखोरी आणि इतर भ्रष्टाचाराचे ९३ खटले या वर्षात निकाली निघाले; मात्र यातील केवळ ९ गुन्ह्यांतच १३ आरोपींना शिक्षा झाली. इतक्या अल्प प्रमाणात जर शिक्षा होत असेल, तर शिक्षेचा धाक कसा रहाणार ?

गर्भारपणाचा बाजार !

सध्या गर्भवती असलेल्या अभिनेत्रींची छायाचित्रे सामाजिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होण्याची नवरूढी निर्माण झाली आहे. प्रसिद्धीमाध्यमेही त्याला बिनधोक प्रसिद्धी देऊन त्यांच्यातील स्पर्धा सांभाळत असतात.

आयुर्वेदाला सर्वमान्यता आवश्यक !

केंद्रशासनाने आयुर्वेदाच्या प्रसारासाठी पदव्युत्तर आयुर्वेदीय वैद्यांना ५८ प्रकारची शस्त्रकर्मे करण्याची अनुमती दिली. केंद्रशासनाने एक चांगला निर्णय घेतलेला असतांना दुसरीकडे अ‍ॅलोपॅथीच्या डॉक्टरांनी मात्र याला विरोध दर्शवत नुकताच एक दिवसाचा देशव्यापी संप केला !

कायदे अनेक, उपाय एक !

कायद्याची प्रभावी कार्यवाही होण्यासाठी ती राबवणारी प्रामाणिक आणि सक्षम व्यवस्था प्रथम अस्तित्वात आणणे आवश्यक आहे.

मंदिरे केवळ अर्थार्जनासाठी ?

‘मंदिर’ या शब्दासाठी ‘रोजगार’ आणि ‘श्रद्धा’, असे २ पर्याय असतील, तर कोणता पर्याय निवडला जाईल ? साहजिकच ‘श्रद्धा’ हाच पर्याय असेल, हे अगदी नास्तिकही सांगतील, तर मग मंदिरे उघडण्यासाठी रोजगाराचे पालूपद लावण्याची आवश्यकता हिंदूंना का भासली ?

वाळू तस्करीवर नियंत्रण कधी ?

अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या पथकावर वाळू तस्करांकडून सशस्त्र आक्रमण केले जाते. त्यांच्याकडे शस्त्रे कुठून येतात ? महसूल विभागाचे पथक कारवाईसाठी येणार असल्याची माहिती या मंडळींना कशी मिळते ? तसेच कायदा-सुव्यवस्था मोडीत काढण्याचे धाडस या लोकांकडे कुठून येते ?

शिक्षित कि अशिक्षित ?

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत एकूण २ लक्ष ४१ सहस्र ९०८ एवढे मतदान झाले. त्यापैकी २३ सहस्र ९२ मते अवैध होती, म्हणजेच झालेल्या एकूण मतदानाच्या जवळपास १० टक्के मतदान अवैध ठरले.