श्रीलंकेच्या नौदलाकडून ९ भारतीय मासेमारांना अटक

श्रीलंकेच्या नौदलाने त्याच्या समुद्री क्षेत्रात बेकायदेशीररित्या प्रवेश करून मासेमारी केल्याच्या प्रकरणी ९ भारतीय मासेमारांना अटक केलीे. या वेळी श्रीलंकेच्या नौदलाने या मासेमारांच्या २ नौकाही कह्यात घेतल्या.

भारतीय नौदलासाठी फ्रान्सकडून २६ राफेल विमानांच्या खरेदी करण्याचा करार !

ही विमाने भारतीय नौदलाच्या आवश्यकतेनुसार विशेषकरून बनवण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भेटीत हा करार झाला.

भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांमध्ये मनुष्यबळाची अदलाबदल होणार !

भारताच्या तिन्ही सैन्यदलांमध्ये मनुष्यबळाची अदलाबदल होणार आहे. ४० सैन्याधिकार्‍यांची एक तुकडी लवकरच भारतीय वायूदल आणि नौदल यांत नियुक्त केली जाणार आहे. येथेही ते भूदलाप्रमाणेच काम करणार आहेत.

सैन्याची गोपनीय माहिती विकल्याच्या प्रकरणी पत्रकार आणि नौदलाचा माजी कमांडर यांना अटक

अशा देशद्रोह्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे !

केरळमध्ये पकडलेल्या अमली पदर्थाचे मूल्य २५ सहस्र कोटी रुपये !

पकडण्यात आलेल्या अमली पदार्थाचे मूल्य इतके आहे, तर आतापर्यंत न पकडण्यात आलेल्या अमली पदार्थांचे मूल्य किती असेल, याची कल्पना करता येत नाही !

गोवा : ‘आय.एन्.एस्. मुरगाव’ युद्धनौकेवरून ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

भारतीय नौदलाने १४ मे या दिवशी ‘आय.एन्.एस्. मुरगाव’वरून ‘ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ’ क्षेपणास्त्राची यशस्वीरित्या चाचणी केली. ‘आय.एन्.एस्. मुरगाव’वरून क्षेपणास्त्राची घेण्यात आलेली ही पहिलीच चाचणी आहे.

केरळच्या समुद्री परिसरात १५ सहस्र कोटी रुपयांचा अमली पदार्थ जप्त 

भारतीय नौदल आणि ‘नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो’ (एन्.सी.बी.) यांनी संयुक्तपणे राबवलेल्या मोहिमेमध्ये भारतीय समुद्री क्षेत्रातील एका जहाजातून १५ सहस्र कोटी रुपयांचा आणि २ सहस्र ५०० किलो वजनाचा मेथामफेटामाइन नावाचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.

हिंदी महासागरात चीनच्या नौदलाच्या वाढत्या उपस्थितीमुळे युद्धाची शक्यता नाकारता येत नाही ! – नौदलप्रमुख हरि कुमार

ते पुढे म्हणाले की, महासागरात कुणाची उपस्थिती आहे आणि ते काय करत आहेत, हे जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. याची सातत्याने निगराणी केली जात आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्यावर ४ डिसेंबर या दिवशी भारतीय नौसेना दिन साजरा होणार

यावर्षी हा सोहळा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठा आरमाराचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखल्या जाणार्‍या सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा केला जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती !

म्हादई अभयारण्यासह अन्य वनक्षेत्रात अजूनही आग

म्हादई अभयारण्यासह अन्य वनक्षेत्रात आग १० मार्च म्हणजे सहाव्या दिवशीही धुमसत होती. विझवलेल्या ठिकाणी आग पुन्हा लागण्याचे प्रकार घडत आहेत, त्यावरही देखरेख ठेवली जात आहे.