नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी २ दिवसीय फ्रान्स दौर्यानंतर संयुक्त अरब अमिरातला पोचले आहेत. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी यांनी भारतीय नौदलासाठी फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हिएशनकडून २६ नवीन अत्याधुनिक राफेल लढाऊ विमाने विकत घेण्याचा करार केला आहे. ही विमाने भारतीय नौदलाच्या आवश्यकतेनुसार विशेषकरून बनवण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भेटीत हा करार झाला. तसेच भारतीय वायूसेनेसाठी फ्रान्सकडून यापूर्वीच ३६ राफेल खरेदी करण्यात आली आहेत.
समंदर में बढ़ेगी भारत की ताकत, भारतीय नौसेना के बेड़े में शामिल होंगे 26 नेवी राफेल, अहम डील को मिली मंजूरी
#navyrafale #pmmodi #EmmanuelMacron @ShivAroor— AajTak (@aajtak) July 15, 2023
या संरक्षण करारात भारताला २२ राफेल-एम् मरीन लढाऊ विमाने मिळणार आहेत. ही लढाऊ विमाने स्वदेशी बनावटीच्या आयएन्एस् विक्रांत या विमानवाहू नौकेवर तैनात केली जातील. याचसह ४ ट्रेनर राफेल मरीन विमाने उपलब्ध होणार आहेत. राफेल-एम् ही फ्रान्सच्या राफेल लढाऊ विमानांची नौदल आवृत्ती आहे. चीन हिंदी महासागरात त्याचेे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे, अशा परिस्थितीत भारतीय नौदलाने समुद्रात स्वतःची शक्ती वाढवून सशक्त रहाण्याची आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन या लढाऊ विमानांची खरेदी करण्यात आली आहे.