नवी देहली – सैन्याची गोपनीय माहिती, तसेच ‘डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन’शी (डी.आर्.डी.ओ.शी) निगडित संवेदनशील माहिती उघड केल्याच्या प्रकरणात केंद्रीय अन्वेेषण विभागाने (सी.बी.आय.ने) मुक्त पत्रकार विवेक रघुवंशी आणि नौदलाचा माजी कमांडर आशिष पाठक यांना अटक केली आहे. या दोघांना अधिकृत गुप्त कायद्याच्या (‘ऑफिशियल सीक्रेट अॅक्ट’च्या) अंतर्गत अटक करण्यात आली आहे. त्यांनी उघड केलेल्या गोपनीय माहितीमुळे भारताचे काही देशांशी असलेल्या संबंधांवर परिणाम होऊ शकतो, असे सांगण्यात आले आहे. गोपनीय माहिती उघड झाल्याच्या प्रकरणात सीबीआयने डिसेंबर २०२२ मध्ये तक्रार नोंदवली होती. रघुवंशी यांच्यावर डी.आर्.डी.ओ.कडून चालू असलेले प्रकल्प, भविष्यात भारत अन्य देशांकडून खरेदी करणार असलेली शस्त्रास्त्रे, मित्रराष्ट्रांसमवेत मुत्सद्दी चर्चा आदी संवेदनशील माहिती गोळा करणे आणि ती अन्य देशांना देणे असा आरोप आहे. रघुवंशी यांनी ही माहिती अमेरिकेतील एका वृत्तसंकेतस्थळालाही पुरवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
#CBI: जासूसी करने के मामले में गिरफ्तार हुए पत्रकार विवेक रघुवंशी और पूर्व नेवी कमांडर आशीष पाठक, जानें क्या है पूरा मामला@DrSJaishankar @MEAIndia #VivekRaghuvanshi #ashishpathak #LatestNews #moneycontrolhttps://t.co/UgedW9b4MC
— Moneycontrol Hindi (@MoneycontrolH) May 17, 2023
१६ मे या दिवशी सीबीआयने विवेक रघुवंशी आणि त्यांच्याशी निगडित जवळचे लोक यांच्या देहली, उत्तरप्रदेश आणि हरियाणा, जयपूर येथील १२ जागांवर धाडी घातल्या. त्या वेळी अनेक संवेदनशील कागदपत्रे मिळाली.
संपादकीय भूमिकाअशा देशद्रोह्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे ! |