मुंबई, ठाणे, रायगड येथे धुळीसह सोसाट्याचा वारा आणि पाऊस !

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील २४ घंट्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ दिला आहे.

घाटकोपर (मुंबई) येथे वादळामुळे होर्डिंग कोसळले; ८० वाहने अडकल्याची शक्यता !  

वडाळा येथे पार्किंग टॉवर कोसळला. क्रेन आणण्यात आलेली आहे. काही गाड्यांची हानी झाली. अडकलेल्या ३० जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. 

Heavy Rains Afghanistan : अफगाणिस्तानमध्ये मुसळधार पावसामुळे ३१५ जणांचा मृत्यू

तालिबान सरकारने आंतरराष्ट्रीय संघटनांना विलंब न करता साहाय्य करण्यास सांगितले आहे. जर या संघटनांनी साहाय्य केले नाही, तर सहस्रो लोक मरतील, असे तालिबानचे म्हणणे आहे.

Bihar Lightning Deaths : बिहारमध्ये वीज पडून ११ जणांचा मृत्यू !

एकीकडे पावसाची शक्यता असतांना देशातील काही राज्यांमधील काही भागांत उष्णतेचा प्रभाव कायम आहे. राजस्थान, ओडिशा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र आणि तेलंगाणा राज्यांमध्ये काही भागात तापमान ४० ते ४३ अंशांच्या दरम्यान नोंदवले जात आहे.

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडच्या जंगलात लागलेल्या आगीमुळे पर्यावरण संकटात !

आगीच्या घटनांमध्ये उत्तराखंड अग्रेसर !

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये लागलेल्या आगीमुळे तब्बल १६७ हेक्टर जंगल जळून भस्मसात !

आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू !

Floods in Brazil:ब्राझिलमध्ये पूर : ५८ जणांचा मृत्यू, ७० सहस्र लोक बेघर !

गुआबा नदीचा स्तर वर्ष १९४१ नंतर सर्वाधिक झाला असून तो ५.०४ मीटर इतक्या उंचीवर आहे. हवामान खात्याने येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

नागपूर येथे भूकंपाचे सौम्य धक्के; २.५ रिश्टर स्केल भूकंपाची नोंद !

शहरात ३ मे या दिवशी दुपारी ३ वाजून ११ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. महिनाभराच्या अंतरात येथे बसलेला हा सलग दुसरा भूकंपाचा धक्का आहे. नागपूर परिसरात २.५ रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता नोंदवण्यात आली आहे

Tornado In USA:अमेरिकेतील ओक्लाहामा आणि आयोवा राज्यांत चक्रीवादळामुळे ४ जणांचा मृत्यू

२७ आणि २८ एप्रिल या दिवशी एकाच वेळी ३५ चक्रीवादळांची नोंद झाली, तर २६ एप्रिलला हा आकडा ७० च्या पुढे होता.

मराठवाडा-विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज, तर कोकणासह आंध्र-तेलंगाणा येथे उष्णतेची लाट !

हवामान खात्याच्या अंदाजानुसार २६ एप्रिल या दिवशी जोरदार वारे वाहिले. मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणा राज्यांत काही ठिकाणी गारपीटही झाली.