मुंबई, ठाणे, रायगड येथे धुळीसह सोसाट्याचा वारा आणि पाऊस !

मुंबई विमानतळावरील धावपट्टी बंद अनेक ठिकाणी झाडे पडली

प्रतिकात्मक चित्र

मुंबई/ठाणे/रायगड – मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगड येथे १३ मे या दिवशी धुळीसह सोसाट्याचा वारा सुटला. काही ठिकाणी पाऊस पडल्याने त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीटही झाली. अनेक ठिकाणी झाडे पडली.

१. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, वांगणी परिसरात सोसाट्याचा वारा सुटला असून एका ठिकाणी पत्रे उडून गेले.

२. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील २४ घंट्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ दिला आहे.

३. ठाणे आणि मुलुंड दरम्यान रेल्वे ‘ओव्हरहेड’ खांब कोसळला.

४. दृश्यमानता अल्प झाल्याने मुंबई विमानतळावरील धावपट्टी बंद करण्यात आली असून विमानांचा मार्ग पालटण्यात आला.

. मेट्रोच्या तारांवर बॅनर कोसळल्याने वाहतून खोळंबली.

६. असल्फा मेट्रा स्टेशनमध्ये पाठी साचले.

७. उच्च दाबाच्या वीज वाहिनीच्या टॉवरने पेट घेतल्याने आग लागली. त्यामुळे ऐरोली आणि दिघा येथे वीज नव्हती.

८. मुंबईमध्ये दादर, परळ, कांदिवली, बोरीवली, विक्रोळी, मुलुंड, भांडुप येथे पाऊस पडला.