Tornado In USA:अमेरिकेतील ओक्लाहामा आणि आयोवा राज्यांत चक्रीवादळामुळे ४ जणांचा मृत्यू

५०० घरे उद्ध्वस्त  

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील आयोवा आणि ओक्लाहोमा या राज्यांमध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे आतापर्यंत एका अर्भकासह ४ जणांचा मृत्यू, तर १०० हून अधिक लोक घायाळ झाले आहेत. वादळामुळे येथील बहुतांश इमारती उद्ध्वस्त झाल्या असून आतापर्यंत ५ सहस्रांहून अधिक लोक बेघर झाले आहेत.

५०० हून अधिक घरे उद्ध्वस्त झाली. २० सहस्रांंहून अधिक लोकांना विजेविना रहावे लागत आहे. ओक्लाहोमा राज्याचे गव्हर्नर केविन स्टिट म्हणाले की, संपूर्ण शहरात विध्वंस झाला आहे. लोकांच्या व्यवसायाची हानी झाली आहे. २७ आणि २८ एप्रिल या दिवशी एकाच वेळी ३५ चक्रीवादळांची नोंद झाली, तर २६ एप्रिलला हा आकडा ७० च्या पुढे होता. यापूर्वी वर्ष १९७४ आणि २०११ मध्ये ओक्लाहोमामध्ये मोठ्या प्रमाणात वादळ आले होते.