Heavy Rains Afghanistan : अफगाणिस्तानमध्ये मुसळधार पावसामुळे ३१५ जणांचा मृत्यू

१ सहस्र ६०० हून अधिक लोक घायाळ, तर २ सहस्र घरे गेली वाहून

काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानमध्ये मुसळधार पावसामुळे आतापर्यंत ३१५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर १ सहस्र ६०० लोक घायाळ झाले आहेत. तसेच २ सहस्रांहून अधिक घरे वाहून गेली आहेत. मृतांचा आकडा अजून वाढू शकतो, असे तालिबान सरकारचे म्हणणे आहे. गेल्या महिन्यातच अफगाणिस्तानातील हेलमंड आणि काजाकी जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे घरे कोसळून ९ जणांचा मृत्यू झाला होता.

१. अफगाणिस्तानमध्ये गेल्या २ आठवड्यांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे बदख्शान, घोर, बागलान आणि हेरात या शहरांमध्ये सर्वाधिक हानी झाली. तालिबान सरकारने आंतरराष्ट्रीय संघटनांना विलंब न करता साहाय्य करण्यास सांगितले आहे. जर या संघटनांनी साहाय्य केले नाही, तर सहस्रो लोक मरतील, असे तालिबानचे म्हणणे आहे.

२. सध्या अफगाणिस्तानातील अनेक राज्यांमध्ये वीज नाही. एक वेळचे जेवण विकत घेण्यासाठी लोकांकडे पैसे नाहीत.