छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे ३४ गावांत १० कोटी ७१ लाख रुपयांच्या पिकांची हानी !

तातडीने आर्थिक साहाय्य मिळावे; शेतकर्‍यांची मागणी !

कोल्हापूर जिल्ह्यात पूरसदृश्य स्थिती

जिल्ह्यातील काही मार्ग वाहतुकीसाठी बंद असून एस्.टी.च्या काही फेर्‍याही रहित करण्यात आल्या आहेत. राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने धरण ८३ टक्के एवढे भरले आहे.

गडचिरोली आणि चंद्रपूर येथे धुवांधार पावसाने जनजीवन विस्कळीत !

नगरपरिषद परिसरात, तसेच शहरात पाणी साचले होते. नागरिकांनी पाण्यातून मार्ग काढला. नगरपरिषदेच्या नियोजनशून्य कारभारामुळे गडचिरोली शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याची चर्चा नागरिकांत होती.

राज्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या आपत्ती विभागाला सूचना !

या पार्श्वभूमीवर एस्.डी.आर्.एफ्., जिल्हा प्रशासन, पोलीस, महापालिका, नगरपालिका आदी विविध स्थानिक स्वराज्य संस्था यांनी सतर्क रहावे आणि नागरिकांना सर्वतोपरी साहाय्य करावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

नागपूरसह विदर्भात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत !

गेल्या दोन दिवसांपासून नागपूरसह विदर्भात मुसळधार पाऊस चालू आहे. त्यामुळे सर्वत्रचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील रस्त्यांना नदी-नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

रायगड जिल्हा अतीवृष्टीला तोंड देण्यासाठी सज्ज !

जिल्ह्यात अंबा आणि कुंडलिका नदीची पातळी धोक्याच्या पातळीपर्यंत वाढली आहे. अतीमुसळधार पावसाची चेतावणी हवामान विभागाने दिली आहे. जुलै अखेरपर्यंत अतीवृष्टी होण्याचा अंदाज आहे.

Flood In UP : उत्तरप्रदेशातील ८०० गावांत पूर !

उत्तराखंडमधील जोशीमठ येथे भूस्खलनामुळे बंद झालेला बद्रीनाथ महामार्ग ८३ तासांनंतर खुला झाला आहे. चार धाम यात्रेतील भाविक मोठ्या संख्येने अडकून पडले होते.

गोव्यात अतीवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात हानी

अतीवृष्टीमुळे राज्यात मोठी हानी झालेली आहे. २४ घंटे सातत्याने कोसळणार्‍या पावसाने ८ जुलै या दिवशी काही वेळ विसावा घेतला. दक्षिणेत केपे येथील कुशावती नदीने, तर उत्तरेत वाळवंटी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

पनवेल परिसरात पावसाचा जोर !

पडघे गावाचा पूल पाण्याखाली गेल्याने औद्योगिक वसाहतीत जाण्यासाठी कर्मचार्‍यांनी ५ फूट पाण्यातून वाट काढली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थितीमुळे जनतेची गैरसोय

जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक खोळंबली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.