Wayanad landslide : वायनाड (केरळ) येथील भूस्खलनात आतापर्यंत १६५ जणांचा मृत्यू !

वायनाडमध्ये अतीवृष्टीनंतर झालेल्या भूस्खलनामुळे मृतांची संख्या आता १६५ वर पोचली आहे. २२० हून अधिक लोक बेपत्ता आहेत.

पाऊस ओसरल्याने पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत संथगतीने उतार !

कोल्हापूर शहरात अनेक उपनगरांमध्ये पाणी असून जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मांगूर फाट्याजवळ पाणी आल्याने एकेरी वाहतूक चालू होती.

Delhi IAS Coaching Centre : देहली येथे मुसळधार पावसामुळे आय.ए.एस्. कोचिंग सेंटरच्‍या ३ विद्यार्थ्‍यांचा मृत्‍यू !

बेकायदेशीर ग्रंथालयामध्‍ये अभ्‍यास करणारे विद्यार्थी दगावले

सांगली येथील कृष्णा नदीची पाणीपातळी ४० फुटांवर !

कृष्णा नदीची पाणीपातळी ४० फूट ३ इंच, तर मिरज येथील कृष्णा घाटावर नदीची पातळी ५२ फूट ४ इंच पोचली आहे. काळजी म्हणून सैन्याची एक तुकडी सांगली येथे आली आहे, तसेच नागरिकांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.

पुणे येथे मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत !

२४ जुलैला रात्री भिडे पूल आणि टिळक पूलही पाण्याखाली गेला आहे. गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्ती आणि संगम पुलासमोरील वस्तीत पाणी गेले आहे.

पवना नदीवरील धामणे गावाला जोडणारा पूल पाण्याखाली; गावाचा संपर्क तुटला !

मावळ परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी झाले आहे. मागील २४ घंट्यांत पवना धरण परिसरात ३७४ मि.मी. पाऊस पडला आहे.

‘लवासा सिटी’त दरड कोसळून २ बंगले मातीच्या ढिगार्‍याखाली गाडले गेले !

स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली; पण बचाव पथकाला घटनास्थळी पोचण्यास विलंब झाला. मुळशी तालुक्यात सर्वत्र पाऊस चालू असल्यामुळे बचाव पथक अडकून पडल्याची माहिती आहे.

कोल्हापूर येथे पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली !

आलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर आंबेवाडी-रजपूतवाडी दरम्यान पाणी आल्याने पोलिसांनी शिवाजी पुलावरील वाहतूक बंद केली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे ३४ गावांत १० कोटी ७१ लाख रुपयांच्या पिकांची हानी !

तातडीने आर्थिक साहाय्य मिळावे; शेतकर्‍यांची मागणी !