छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे ३४ गावांत १० कोटी ७१ लाख रुपयांच्या पिकांची हानी !

तातडीने आर्थिक साहाय्य मिळावे; शेतकर्‍यांची मागणी !

प्रातिनिधिक छायाचित्र

छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील ११ मंडळांत ७ आणि ८ जुलै या दिवशी झालेल्या अतीवृष्टीमुळे ३४ गावांमधील ७ सहस्र ७९८ शेतकर्‍यांचे खरीप पिक, फळबाग आणि बागायतीचे ७ सहस्र ७९५.६६ हेक्टर भूमीवरील १० कोटी ७१ लाख रुपयांची हानी झाली आहे.

खामगाव तहसील अंतर्गत अटाळी, अडगांव, आवार, पळशी बु., पारखेड, वझर, लाखनवाडा, पिंपळगावराजा, हिवरखेड, काळेगाव खामगाव आणि जनुना १२ मंडळाचा समावेश आहे. यापैकी पारखेड मंडळ वगळता उर्वरीत मंडळात ७ आणि ८ जुलै या दिवशी अतीवृष्टीमुळे या मंडळातील शेतकर्‍यांची शेती आणि फळबागा यांची हानी झाली आहे. शेतीची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. आमदार आकाश फुंडकर यांसह विविध खात्यांतील शासकीय अधिकार्‍यांनी हानीची पहाणी केली.