कोरोनाविरोधात लढण्यासाठी सैन्य सज्ज ! – सैन्यदल प्रमुख
कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी सैन्य पूर्णपणे सज्ज आहे. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सैन्य पूर्ण सामर्थ्य देईल, असे प्रतिपादन सैन्यदल प्रमुख मनोज नरवणे यांनी केले.
कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी सैन्य पूर्णपणे सज्ज आहे. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सैन्य पूर्ण सामर्थ्य देईल, असे प्रतिपादन सैन्यदल प्रमुख मनोज नरवणे यांनी केले.
देशभरात दळणवळण बंदी लागू असतांना अर्थव्यवस्था आणि कर्जभार असलेल्या व्यक्ती यांना आधार देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने विविध कर्जांच्या व्याजदरात कपात केली. मुदतीच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी ३ मासांपर्यंतची सवलत दिली आहे.
कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी साहाय्य म्हणून प्रत्येक जण पुढे येऊ लागले आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (‘सी.आर्.पी.एफ्.’च्या) सैनिकांनीही स्वेच्छेने त्यांचे एक दिवसाचे वेतन दिले आहे.
दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांचे चित्रीकरण थांबल्याने त्यांचे प्रसारणही होत नाही, अशा वेळी ‘रामायण’ ही जुनी आणि अत्यंत गाजलेली मालिका दाखवण्याची मागणी लोकांकडून झाल्यामुळे केंद्र सरकारने ती दूरदर्शनवर पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला.
भारतातील बर्याच मशिदींमध्ये देशविघातक कारवाया चालतात, असा गुप्तचर विभागाचा अहवाल आहे. त्याच वेळी अशांवर कारवाई केली असती, तर ही वेळ आली नसती. अशा मशिदी आणि मौलवी यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकारने कृती करावी, अशी राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !
येथील मौजपूरमधील ‘मोहल्ला क्लिनिक’च्या (देहली सरकारकडून चालवण्यात येणारे लहान चिकित्सालय) एका डॉक्टरला कोरोनाची बाधा झाल्याचे तपासणीअंती निष्पन्न झाले आहे. यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या ८०० जणांना विलगीकरण (क्वारंटाईन) करण्यात आले आहे.
लष्कर ए-तोयबा या जिहादी आतंकवादी संघटनेने पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.च्या साहाय्याने ‘द रजिस्टेंस फ्रंट जम्मू-कश्मीर’ नावाची नवी जिहादी आतंकवादी संघटना बनवली आहे. या संघटनेच्या ६ आतंकवाद्यांना पोलिसांंनी अटक करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे.
देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आतापर्यंत ७५३ झाली असून एकूण २० जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण ६६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
देशात दळणवळण बंदी आणि ‘सोशल डिस्टन्सिंग’ (एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे) केल्याने कोरोनाचा संसर्ग बर्याच प्रमाणात रोखता येईल……
स्वतःच्या आणि जनतेच्या आरोग्याशी खेळणार्या अशा जनताद्रोह्यांवर केवळ गुन्हा नोंद न करता सरकारने त्यांना तात्काळ अटक करून आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !