देहलीतील ‘मोहल्ला क्लिनिक’चा डॉक्टर, त्याची पत्नी आणि मुलगी यांना कोरोनाची लागण

डॉक्टरच्या संपर्कातील ८०० जणांचे विलगीकरण

एकमेकांच्या संपर्कात आल्याने कोरोना अतीवेगाने पसरतो, हे भारतीय जनतेने यातून लक्षात घ्यावे आणि त्यांना सांगण्यात आलेली सर्वप्रकारची काळजी त्यांनी अत्यंत गांभीर्याने घ्यावी !

नवी देहली – येथील मौजपूरमधील ‘मोहल्ला क्लिनिक’च्या (देहली सरकारकडून चालवण्यात येणारे लहान चिकित्सालय) एका डॉक्टरला कोरोनाची बाधा झाल्याचे तपासणीअंती निष्पन्न झाले आहे. यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या ८०० जणांना विलगीकरण (क्वारंटाईन) करण्यात आले आहे. या डॉक्टरमुळे त्याची पत्नी आणि मुलगी यांनाही कोरोनाचे संक्रमण झाले आहे.

सौदी अरेबियामधून आलेली एक महिला सदर डॉक्टरकडे उपचारांसाठी आली होती. या महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे नंतर आढळले होते. तिच्यामुळे या डॉक्टरला कोरोनाचे संक्रमण झाले. या महिलेच्या कुटुंबातील ४ जण आणि तिचा एक शेजारी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.