पोलिसांची ३ वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई
स्वतःच्या आणि जनतेच्या आरोग्याशी खेळणार्या अशा जनताद्रोह्यांवर केवळ गुन्हा नोंद न करता सरकारने त्यांना तात्काळ अटक करून आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !
हरदोई (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील हरदोई आणि बहराइच या जिल्ह्यांत दळणवळण बंदी असतांनाही मशिदीत नमाजपठणासाठी मुसलमानांना गोळा करणार्या ३ इमामांसह एकूण ६० जणांवर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
१. बहराइचचे पोलीस अधीक्षक विपिन मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमाम इमरान खान आणि इतर २० जण आझादनगरच्या एका मशिदीत गोळा झाले होते. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंदवला. जमलेल्या लोकांनी ‘इमरान खान यांनी आम्हाला नमाजपठणासाठी मशिदीत बोलावले’, असे पोलिसांना सांगितले.
२. हरदोईमधील संडीला भागात इमाम महंमद आसिफ आणि इतर २० जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.
३. कोतवाली येथेही पोलिसांनी इमाम अली अहमद आणि इतर २० जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.