दूरदर्शनवर ‘रामायण’ मालिका २८ मार्चपासून पुन्हा प्रसारित करणार ! – केंद्र सरकार

लोकांच्या मागणीनंतर केंद्र सरकारचा निर्णय

केंद्र सरकारचा अभिनंदनिय निर्णय ! आपत्काळात अशा आदर्श मालिकांद्वारे नागरिकांचे आध्यात्मिक आणि नैतिक बळ वाढवणे आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन सरकारने अशा आणखी मालिका चालू कराव्यात !

नवी देहली – कोरोनामुळे संपूर्ण देशात दळणवळण बंदी असल्याने नागरिक घरीच थांबले आहेत. त्यातच दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांचे चित्रीकरण थांबल्याने त्यांचे प्रसारणही होत नाही, अशा वेळी ‘रामायण’ ही जुनी आणि अत्यंत गाजलेली मालिका दाखवण्याची मागणी लोकांकडून झाल्यामुळे केंद्र सरकारने ती दूरदर्शनवर पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला.

माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती ट्वीट करून दिली. ‘लोकांच्या मागणीनुसार ‘रामायण’ ही लोकप्रिय मालिका २८ मार्चपासून ‘डीडी नॅशनल’ या सरकारी वाहिनीवर प्रतिदिन सकाळी ९ ते १० आणि तीच मालिका पुन्हा रात्री ९ ते १० या वेळेत प्रसारित करण्यात येणार आहे’, असेही जावडेकर यांनी सांगितले.