केरळच्या बिशपकडून सत्ताधारी माकपकडे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत एका ख्रिस्ती उद्योगपतीला तिकीट देण्याची शिफारस !

अशी शिफारस हिंदूंच्या एखाद्या संतांनी केली असती, तर तथाकथित निधर्मीवादी, साम्यवादी आणि पुरो(अधो)गाम्यांनी एकच हल-कल्लोळ केला असता !

१३ वर्षे संघर्ष करूनही न्याय मिळत नसल्याने प्रजासत्ताकदिनी आत्मदहन करणार !

देशासाठी हुतात्मा झालेल्या सैनिकाच्या वीरपत्नीस जर १३ वर्षे न्याय मिळत नसेल, तर प्रशासनासाठी हे लज्जास्पद आहे !

देहलीतील आजच्या ट्रॅक्टर मोर्च्यात गोंधळ घालण्यासाठी ३०८ पाकिस्तानी ट्विटर खाती कार्यरत ! – देहली पोलिसांचा दावा

उद्या २६ जानेवारी या प्रजासत्ताकदिनी देहलीच्या सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहेत. या मोर्च्यावर नियंत्रण ठेवून गोंधळ घालण्यासाठी पाकमधील ३०८ ट्विटर खाती कार्यरत असल्याची माहिती देहली पोलिसांना मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश यांसह उत्तर भारतात शीतलहर

गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश राज्यांत शीतलहर आल्याचे दिसून येत आहे. येथे बहुतांश भागांमध्ये बर्फवृष्टीही होत आहे. हिमाचल प्रदेशात कुफरी, भरमौर, किलाँग आणि कल्पा या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊसही झाला.

रामाचे नाव गळ्यात गळा घालून घ्यायला हवे, गळा दाबून नाही ! – तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँ

नुसरत जहाँ यांनी हाच सल्ला ममता बॅनर्जी यांना दिला पाहिजे ! या देशात रहाणार्‍यांनी ‘जय श्रीराम’ म्हणण्यासह जे म्हणत आहेत, त्यांना साथ दिली पाहिजे; मात्र ममता बॅनर्जी ना ‘जय श्रीराम’ म्हणत आहेत, ना अन्य कुणी म्हटले, तर ते त्या स्वीकरत आहेत.

पत्नीच्या बँक खात्यांचा तपशील मागण्याचा अधिकार पतीला नाही ! – केंद्रीय माहिती आयोग

केंद्रीय माहिती आयोगाने म्हटले की, एखाद्याने प्राप्तीकर विवरणपत्र भरणे ही सार्वजनिक गोष्ट होऊ शकत नाही. नागरिकाने कर भरणे हे कर्तव्य बजावण्यासारखे आहे. त्यामुळे व्यापक जनहिताचा उद्देश नसेल, तर अशी माहिती अर्जदाराला देता येणार नाही.

(म्हणे) ‘नागपूरचे ‘हाफ चड्डीवाले’ तमिळनाडूचे भविष्य कधीच ठरवू शकत नाहीत !’

केवळ पंचा नेसून, डोक्यावर पांढरी टोपी घालून, कोटवर गुलाब लावून देशाची फाळणी करणार्‍या आणि बहुसंख्य हिंदूंचे भविष्य नष्ट करणार्‍या काँग्रेसवाल्यांनी देशाचे किती भले केले ?, याचे उत्तर राहुल गांधी यांनी दिले पाहिजे !

शेतकरी आंदोलनामध्ये गेलेल्या काँग्रेसच्या खासदारावर आक्रमण : वाहनाचीही तोडफोड

देहलीच्या सीमेवर चालू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनामध्ये गेलेले काँग्रेसचे खासदार रणवीत सिंह बिट्टू यांच्यावर आक्रमण करण्यात आले. त्यांना धक्काबुक्की करण्यात आली, तसेच त्यांची पगडी खेचण्यात आली.

नाशिक येथे होणार्‍या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर यांची निवड

भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान कथालेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य संमेलनाच्या आतापर्यंतच्या ९३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच संशोधकाची संमेलनाध्यक्षपदी निवड झाली आहे.

सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी एन्.सी.बी.च्या मुंबई पाठोपाठ पुण्यातही धाडी

अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात अमली पदार्थ तस्करीचे मोठे जाळे समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या (एन्.सी.बी.) पथकाने मुंबई पाठोपाठ पुण्यातील हडपसर आणि खडकवासला परिसरात धाडी टाकल्या.