पत्नीच्या बँक खात्यांचा तपशील मागण्याचा अधिकार पतीला नाही ! – केंद्रीय माहिती आयोग

नवी देहली – माहिती अधिकार कायद्यानुसार पत्नीच्या बँक खात्याचे तपशील आणि प्राप्तिकर विवरणपत्राची मागणी करण्याचा अधिकार पतीला नाही, असा निकाल केंद्रीय माहिती आयोगाने दिला आहे. एका अर्जदाराने माहिती अधिकार कायद्यांतर्गत स्वतःच्या पत्नीची खाती असलेल्या बँकांची नावे आणि त्यांच्या शाखांचे पत्ते देण्याची मागणी केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकार्‍यांकडे केली होती; परंतु माहिती अधिकार्‍यांनी ती देण्यास नकार दिल्याने अर्जदाराने माहिती आयोगाकडे दाद मागितली होती.

केंद्रीय माहिती आयोगाने म्हटले की, एखाद्याने प्राप्तीकर विवरणपत्र भरणे ही सार्वजनिक गोष्ट होऊ शकत नाही. नागरिकाने कर भरणे हे कर्तव्य बजावण्यासारखे आहे. त्यामुळे व्यापक जनहिताचा उद्देश नसेल, तर अशी माहिती अर्जदाराला देता येणार नाही.