नवी देहली – गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश राज्यांत शीतलहर आल्याचे दिसून येत आहे. येथे बहुतांश भागांमध्ये बर्फवृष्टीही होत आहे. हिमाचल प्रदेशात कुफरी, भरमौर, किलाँग आणि कल्पा या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊसही झाला. पुढील २ दिवसांपर्यंत या भागात किमान तापमान हे शून्यापेक्षाही ३ – ४ अंश सेल्शिअसने अल्प असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. ं
राजस्थान, मध्यप्रदेशसह महाराष्ट्रातही थंडीची जाणीव होत आहे. नाशिक, परभणी, नागपूर आणि सोलापूर या भागांमध्ये हवामानात गारवा आला आहे. मुंबईसह उपनगरांतही थंडीचे प्रमाण वाढले आहे.