देशातील युवकांच्या मनात सावरकर यांच्या राष्ट्रभक्तीचे बीज पेरायला हवे ! – उदय माहुरकर, माहिती आयुक्त, केंद्र सरकार
सावरकर यांची हिंदु राष्ट्राची संकल्पना ही स्पष्ट होती. हिंदु राष्ट्रात त्यांना सर्व जाती-धर्मांना समान हक्क अभिप्रेत होते. त्यांची लढाई ही सामान्य अधिकारांसाठी होती. सावरकर यांचा प्रखर राष्ट्रवाद हा मुसलमानांच्या तुष्टीकरणाच्या आड येत असल्यामुळे काँग्रेसकडून त्यांना विरोध झाला.