‘लंडनमध्ये एकदा गुप्तचरांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अडवले आणि म्हटले, ‘‘महाशय, क्षमा करा. आम्हाला तुमच्याविषयी संशय आहे. तुमच्यापाशी घातक हत्यार आहे, अशी निश्चित वार्ता असल्याने तुमची झडती घ्यायची आहे.’’ सावरकर थांबले आणि गुप्तचरांनी त्यांची झडती घेतली. काहीच सापडले नाही. तेव्हा गुप्तचरांचा प्रमुख अधिकारी सावरकर यांना म्हणाला, ‘‘क्षमा करा, चुकीच्या वार्तेमुळे तुम्हाला त्रास झाला.’’
(साभार : साप्ताहिक ‘विटा दर्शन’, सोमवार १ ते ७ मार्च २०२१)