ज्या वेळी ‘लव्ह जिहाद’च्या धोक्याविषयी हिंदु बांधव सांगतात, तेव्हा ‘लग्न करणारी हिंदु युवती आणि मुसलमान युवक यांनी कुणाशी विवाह करायचा, हा त्यांचा घटनात्मक अधिकार आहे’ असा युक्तीवाद मुसलमान अन् निधर्मी विचारसरणीचे लोक करतात; मात्र जेव्हा ‘समान नागरी कायदा’, ‘गोहत्या रोखणे’, असे अनेक विषय येतात. तेव्हा मुसलमान आणि निधर्मी राज्यघटनेची भाषा पुढे करून हिंदूंनी अल्पसंख्यांकांच्या भावनांचा विचार करावा, असा आग्रह करतात. एकंदरीत हिंदूंच्या भावनांचा कुठेच विचार केला जात नाही आणि सोयीस्कररित्या विषय पालटला जातो.
धर्मांध आणि साम्यवादी यांची वरील प्रकारची दुट्टपी भूमिका हिंदूंनी समजून घ्यायला हवी. जेव्हा हिंदू त्यांच्या धार्मिक भावनांविषयी बोलतात, तेव्हा धर्मांध आणि साम्यवादी लोक राज्यघटनेविषयी बोलतात. जेव्हा हिंदू समान नागरी कायद्याविषयी बोलतात, तेव्हा ते धार्मिक आणि वैयक्तिक स्वातंत्र्याविषयी बोलतात.