केरळमधील ख्रिस्ती प्राध्यापकाचा हात तोडल्याच्या १३ वर्षे जुन्या प्रकरणात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चे ६ जण दोषी !

विशेष ‘एन्.आय.ए.’ न्यायालयाचे न्यायाधीश अनिल के. भास्कर यांनी खटल्याच्या दुसर्‍या टप्प्यात आरोपींना भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत हत्येचा प्रयत्न, कट रचणे आणि इतर गुन्हे, यांसाठी दोषी ठरवले.

राजस्थानात अटकेत असलेला कुख्यात गुंड कुलदीप जघीना याची गुंडांनी गोळ्या घालून केली हत्या !

भूमीच्या व्यवहारावर कृपाल सिंह जघीना यांनी स्थगिती आणली होती. या रागापोटीच कुलदीप जघीना आणि त्याच्या साथीदारांनी कृपाल सिंह यांची गोळ्या घालून हत्या केली होती.

हत्येमध्ये साहाय्य केल्याप्रकरणी सिंगापूरमधील भारतीय वंशाच्या व्यक्तीला २२ मासांच्या कारावासाची शिक्षा !

मगेश्‍वरन् याच्यावर याआधीही अनेक गुन्हे नोंद असून यांमध्ये लोकांना त्रास देणे, भाला बाळगणे आणि वाहतूक यांच्याशी संबंधित गुन्ह्यांचा समावेश आहे.

देहलीमध्ये हिंदु तरुणाची हत्या करणार्‍या २ धर्मांध मुसलमानांना अटक

मुसलमान महिलेसमवेत व्हिडिओ बनवण्याच्या रागातून हत्या

१०८ कामकुमारनंदी महाराज यांच्या हत्येचे उच्चस्तरीय अन्वेषण करा ! – विश्‍व हिंदु परिषद आणि साधू-संत यांची पत्रकार परिषदेत मागणी

बेळगाव येथील १०८ कामकुमारनंदी महाराज यांच्या हत्येचे उच्चस्तरीय अन्वेषण करावे, अशी मागणी विश्‍व हिंदु परिषद आणि साधू-संत यांनी ११ जुलैला कन्नड साहित्य भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत केली.

देहली दंगलीत पोलीस हवालदाराची हत्या करणार्‍या महमंद खालिद याला मणीपूरमध्ये अटक !

अशांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे !

कर्नाटकमध्ये क्षुल्लक कारणावरून हिंदुत्वनिष्ठ संघटना युवा ब्रिगेडच्या कार्यकर्त्याची निर्घृण हत्या !

या प्रकरणी मणीकंठ आणि संदेश यांना अटक करण्यात आली असून अन्य ४ जण अद्याप पसार आहेत. येथे हनुमान जयंतीच्या निमित्ताने मिरवणूक काढण्यात आली होती. तेव्हा हा वाद झाला.

मंगळुरू (कर्नाटक) येथे मुसलमान दुकानदाराने क्षुल्लक कारणावरून हिंदु कर्मचार्‍याला पेट्रोल टाकून जिवंत जाळले !

काही दिवसांपूर्वी धर्मांधांनी एका जैन मुनींची हत्या करून त्यांचे अनेक तुकडे करून कूपनलिकेत टाकण्याची घटना घडली होती. यावरून कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यापासून मोगल राजवट आल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेसला निवडून देणारे हिंदू आता जागे होतील का ?

जैन मुनी हत्‍येचे अन्‍वेषण सीबीआयकडे द्या ! – अभय पाटील, आमदार, भाजप

चिक्‍कोडी तालुक्‍यातील हिरेकोडी नंदीपर्वत जैन आश्रमाचे १०८ कामकुमारनंदी महाराज यांच्‍या हत्‍येच्‍या अन्‍वेषणात पोलिसांकडून सत्‍य समोर येत नाही. त्‍यामुळे हे अन्‍वेषण सीबीआयकडे (केंद्रीय अन्‍वेषण यंत्रणा) द्यावे, अशी मागणी बेळगाव दक्षिणचे भाजपचे आमदार अभय पाटील आणि माजी आमदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

बेळगाव येथील जैन मुनि कामकुमार नंदी महाराज यांची हत्या

बेळगाव येथील जैन मुनि कामकुमार नंदी महाराज हे ५ जुलैपासून बेपत्ता होते. मुनींची हत्या करून त्यांचा मृतदेह फेकून देण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी २ जणांना अटक केली असून त्यांनी हत्या केल्याची स्वीकृती दिली आहे.