श्रद्धा वालकर हिची हत्या करणार्‍या आफताबला त्वरित फाशी द्या !

हिंदु जनजागृती समितीकडून वडोदरा (गुजरात) येथील निवासी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

निवासी जिल्हाधिकारी बी.एस्. प्रजापती यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

वडोदरा (गुजरात) – येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी बी.एस्. प्रजापती यांना ‘श्रद्धा वालकर हिची हत्या करून तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करणार्‍या आफताबला त्वरित फाशी देण्यात यावे’, याविषयीचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात ‘यापूर्वी मालेगाव, अमरावती, मुंबई, कोल्हापूर आदी ठिकाणी झालेल्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्र सरकारने दोषींच्या विरुद्ध तत्परतेने कार्यवाही करावी, तसेच संपूर्ण देशासाठी ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करावा’, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.